अकोला : डॉ.पुरुषोत्तम तायडेंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 10:42 AM2020-11-04T10:42:48+5:302020-11-04T10:45:58+5:30

Akola crime News डॉक्टर पुरुषोत्तम तायडे यांना तातडीने अटकही करण्यात आली आहे.

Filed a case of molestation against Doctor in Akola | अकोला : डॉ.पुरुषोत्तम तायडेंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

अकोला : डॉ.पुरुषोत्तम तायडेंविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देडॉ. पुरुषोत्तम तायडे यांनी तिची सोनोग्राफी करण्यासाठी तिला कॅबिनमध्ये झोपवले. गैरवर्तन केल्यामुळे पीडितेने डॉक्टरच्या कानशिलेत लगावली. विशेष बाब म्हणजे पीडिता ही दिव्यांग आहे.

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या महावितरण कार्यालयासमोरील डॉक्टर पुरुषोत्तम तायडे यांच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या एका विकलांग महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मराठा सेवा संघाचे पदाधिकारी तथा डॉक्टर पुरुषोत्तम तायडे यांच्याविरुद्ध रामदासपेठ पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा बलात्काराचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉक्टर पुरुषोत्तम तायडे यांना तातडीने अटकही करण्यात आली आहे.

खामगाव जिल्ह्यातील एक छोट्याशा गावात राहणाऱ्या परिवारातील एक पीडिता तिच्या आई आणि भावासोबत अकोल्यात आली. दोन वर्षांपासून पोटात दुखत असल्याने दुर्गा चौक स्थित नामांकित डॉक्टर पुरुषोत्तम तायडे यांच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आली असता सदर डॉ. पुरुषोत्तम तायडे यांनी तिची सोनोग्राफी करण्यासाठी तिला कॅबिनमध्ये झोपवले. यावरून पीडितेच्या आईला व भावाला शंका आल्याने त्यांनी डॉक्टर आत काय करतो आहे, हे पाहण्याचा प्रयत्न केला असता, या डॉक्टरने पीडितेच्या आई व भावाला कॅबिनबाहेर काढले. डॉक्टर पुरुषोत्तम तायडे यांनी पीडितेसोबत गैरवर्तन केल्यामुळे पीडितेने डॉक्टरच्या कानशिलेत लगावली. महिलेची तपासणी होताच सदर पीडितेने कॅबिनमध्ये घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगताच पीडितेच्या भावाने रामदास पेठ पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. डॉक्टरने विनयभंग केल्याचा आरोप करीत पोलीस स्टेशन गाठल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सदर प्रकरणात रामदास पेठ पोलिसांनी डॉ. पुरुषोत्तम तायडे यांना अटक केली असून, त्याच्या विरोधात रामदास पेठ पोलिसांनी भादंवि कलम ३५४, ३७६,सी (डि) एल, ३७७ नुसार दाखल केला. विशेष बाब म्हणजे पीडिता ही दिव्यांग आहे.

महिलेने केलेले आरोप साफ चुकीचे आहेत. महिला मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टरकडे उपचार घेत आहे. त्यामुळे महिलेने केलेले आरोप आकसपोटी केले आहेत. पोलीस चौकशीत तसेच न्यायालयात प्रकरणाची सत्यता समोर येईलच.

- डॉ. पुरूषोत्तम तायडे

Web Title: Filed a case of molestation against Doctor in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.