जिल्हा बँकेतील जुन्या नोटांचा मार्ग मोकळा

By Admin | Published: June 22, 2017 04:49 AM2017-06-22T04:49:53+5:302017-06-22T04:49:53+5:30

आरबीआय जुन्या नोटा स्वीकारणार; अकोला बँकेकडे ९४ कोटी, तर बुलडाण्यात ९३ लाखांची शिल्लक

Fill the old notes of the bank in the district bank | जिल्हा बँकेतील जुन्या नोटांचा मार्ग मोकळा

जिल्हा बँकेतील जुन्या नोटांचा मार्ग मोकळा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : राज्यातील जिल्हा बँकांमध्ये असणार्‍या ५00 आणि १000 रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेत भरायला केंद्राने मंजुरी दिली आहे. केंद्राच्या या निर्णयानुसार ३0 जूनपयर्ंत जिल्हा बँकांना त्यांच्याकडील जुन्या नोटा आरबीआयमध्ये भरता येणार आहेत. यामुळे अकोला जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेकडे असलेल्या ९४ कोटी, तर बुलडाणा जिल्हा सहकारी बँकेतील ९३ लाखांच्या शिल्लक रकमेचा मार्ग मोकळा झाला आहे.
रिझर्व्ह बँकेने ५00 व १000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय ८ नोव्हेंबरला घेतला होता. नोटाबंदीनंतर तीन दिवसांत जिल्हा बँकेने रिझर्व्ह बँकेच्या परवानगीने जुन्या नोटा स्वीकारल्या होत्या. त्यानंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा झालेल्या ५00 व १000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला होता. याबाबतचा अध्यादेश रिझर्व्ह बँकेने काढला होता. त्यामुळे जिल्हा बँकांमध्ये गेली सहा महिने पडून असलेले या नोटांचे करायचे काय, असा प्रश्न बँकांसमोर होता. नोटाबंदीनंतर सर्वसामान्य लोकांनी ८ नोव्हेंबर ते ३0 डिसेंबर या काळात जिल्हा बँकेत भरलेल्या नोटांचाही यामध्ये समावेश आहे. जिल्हा बँकेत भरलेल्या जुन्या नोटा आरबीआयने घ्यायला नकार दिल्यामुळे बँका अडचणीत आल्या होत्या. पण, केंद्राच्या या निर्णयामुळे जिल्हा बँकांना दिलासा मिळणार आहे. केंद्राने योग्य ती तपासणी करून हा निर्णय घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानुसार आरबीआय स्वीकारणार आहे. अकोला जिल्हा बँकेत तब्बल ९४ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा आहेत, अशी माहिती अकोला जिल्हा सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी दिली, तर बुलडाण्यात ९३ लाखांची शिल्लक आहे. ही रक्कम आता आरबीआय स्वीकारणार असल्याने बँकेला मोठा दिलासा मिळाला आहे.

कर्ज वाटपासाठी होणार मदत
सध्या शेतकर्‍यांना तत्काळ दहा हजारांचे कर्ज वाटप, तसेच पीक कर्ज वाटपासाठी जिल्हा बँकांना रकमेची आवश्यकता आहे. अशा स्थितीत आरबीआय नोटा स्वीकारणार असल्याचा निर्णय झाल्यामुळे याचा लाभ कर्ज वाटपासाठी होणार आहे.

बुलडाणा जिल्हा बँक ही आता अडचणीतून बाहेर येत असून, आर्थिक व्यवहार सुरळीत होत आहेत. नोटाबंदीनंतर बँकेकडे ९३ लाखांच्या जुन्या नोटा आहेत, त्या स्वीकारल्या जाणार असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
- डॉ.अशोक खरात, सीईओ बुलडाणा जिल्हा सहकारी बँक

या निणर्यामुळे कृषी कर्ज वाटपासाठी मोठी रक्कम बँकेकडे उपलब्ध होणार असल्याने बँकेवरील आर्थिक ताण कमी होईल.
- अनंत वैद्य, सीईओ अकोला जिल्हा सहकारी बँक

Web Title: Fill the old notes of the bank in the district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.