पावसाळ्यापूर्वी खड्डे बुजवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:14 AM2021-05-28T04:14:59+5:302021-05-28T04:14:59+5:30
........... दीपाली सोसे यांची कोंच फिल्म फेस्टिव्हलच्या राज्य प्रमुखपदी अकोला : आनंदी गुरुकुल ॲक्टिंग अकॅडमी आणि विद्यार्थी सर्वांगीण विकास ...
...........
दीपाली सोसे यांची कोंच फिल्म फेस्टिव्हलच्या राज्य प्रमुखपदी
अकोला :
आनंदी गुरुकुल ॲक्टिंग अकॅडमी आणि विद्यार्थी सर्वांगीण विकास केंद्र, अकोलाच्या संस्थापिका प्रा. दीपाली आतिश सोसे यांची उत्तरप्रदेश राज्यातील जगप्रसिद्ध ‘कोंच इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’च्या महाराष्ट्र राज्याच्या प्रमुखपदी निवड झाल्याचे फेस्टिव्हलचे प्रमुख पारसमणी अग्रवाल यांनी कळविले आहे. यांच्यासह मध्यप्रदेश प्रमुखपदी दिग्दर्शक राज पेंटर तर छत्तीसगढ प्रमुखपदी दिग्दर्शक अखिलेश वर्मा यांची निवड करण्यात आली आहे.
.........
राणी सती दादी यांना लड्डूचा भोग
अकोला : स्थानिक राणी सती धाममध्ये मातेला साकडे घालून त्यांना प्रसन्न करण्यासाठी मोठ्या भक्तिभावात लड्डू भोग उत्सव साजरा करण्यात आला. धामचे सर्व सेवाधिकारी जगदीश बाचुका यांच्या पुढाकाराने दादी यांना कौल लावून लड्डू भोग उत्सव संपन्न झाला. यावेळी जगदीश बाचुका, नवीन झुनझुनवाला, लक्ष्मीकांत पाडीया, प्रमोद झुनझुनवाला, मनीष बाचुका, कमल गुप्ता, सोहन अग्रवाल, चेतन भाटिया, राजू कारीवाल, संजय अग्रवाल उपस्थित होते.
.....................
कोरोनात निराधार झालेल्या बालकांच्या संगोपनासाठी पुढे आली उत्कर्ष शिशू संस्था
अकोला : काेराेनाने आई-वडील मयत झाल्यामुळे अनाथ व निराधार झालेल्या बालकांच्या संगोपन व पुनर्वसनासाठी उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रम संस्था पुढे आली आहे. ही संस्था कोरोनामध्ये आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या बालक व बालिकांचे संगोपन व संवर्धन करणार आहे.
उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रम अशा निराधार बालक, बालिकांना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मदत करणार आहे. या संदर्भात संस्थेने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन अशा निराधार बालक, बालिकांचे संगोपन व पुनर्वसन करण्याची परवानगी मागितली आहे, अशी माहिती उत्कर्ष शिशुगृहाचे अध्यक्ष विजय जानी, गायत्री बालिकाश्रमाचे अध्यक्ष दादा पंत, संस्था सचिव गणेश काळकर यांनी दिली आहे.
.........................