चित्रपट समाजाला नवी दिशा देण्याचे काम करतात- संजय धोत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 10:33 AM2019-12-28T10:33:05+5:302019-12-28T10:33:19+5:30

लघुचित्रपटाद्वारे कमी वेळात लाखो लोकांपर्यंत पोहचून समाज जागृती करता येते, असे मत मानव संसाधन व दूरसंचार केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केले.

The film works to give a new direction to the society - Sanjay Dhotre | चित्रपट समाजाला नवी दिशा देण्याचे काम करतात- संजय धोत्रे

चित्रपट समाजाला नवी दिशा देण्याचे काम करतात- संजय धोत्रे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : चित्रपट किंवा नाटक समाजाला नवी दिशा देण्याचे काम करीत असतात. समाजाचे प्रबोधन करणे, समाजाची जडण-घडण करण्यासाठी चित्रपटांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांकडे तीन तासांचा चित्रपट पाहण्यासाठी वेळ नसतो. यासाठी लघुचित्रपट उत्तम पर्याय आहे. लघुचित्रपटाद्वारे कमी वेळात लाखो लोकांपर्यंत पोहचून समाज जागृती करता येते, असे मत मानव संसाधन व दूरसंचार केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी व्यक्त केले.
डॅडी देशमुख स्मृती दुसऱ्या आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उद्घाटक म्हणून संजय धोत्रे बोलत होते. शुक्रवारी अकोल्यात आंतरराष्ट्रीय लघुचित्रपट महोत्सवाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिग्दर्शक उमेश कुळकर्णी होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती दिग्दर्शक राजदत्त, बालकलावंत श्रीनिवास पोफळे, राष्ट्रीय वाहिनीवरील मालिका विजेता बबिता ताडे, आयोजन समितीचे प्रमुख माजी आमदार तुकाराम बिरकड, विजय देशमुख, प्रशांत देशमुख, प्रा. संजय खडक्कार, प्रा. मधू जाधव, अर्चना पोफळे, गणेश पोफळे, संजय शर्मा आदी मान्यवर विराजमान होते. प्रास्ताविक तुकाराम बिरकड यांनी केले. विदर्भाचे चित्रपट महर्षी डॅडी देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विदर्भातील नवोदित कलावंतांना प्लॅटफार्म मिळावा, यासाठी लघुचित्रपट महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. यंदा देश-विदेशातून १६२ लघुचित्रपटांच्या प्रवेशिका प्राप्त झाल्या.
यानंतर मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाच्या ट्राफीचे अनावरण करण्यात आले. दिग्दर्शक राजदत्त यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. विदर्भाचे नाव देशपातळीवर पोहचविणारा राष्ट्रीय पुरस्कार विजेता बालकलावंत श्रीनिवास पोफळे, बबिता ताडे यांना गौरविण्यात आले. याप्रसंगी चित्रपटसृष्टीत अकोल्याचे नावलौकिक करणाºया कलावंतांचा सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्ती श्रीनिवास पोफळे व बबिता ताडे यांची लघू प्रकट मुलाखत घेण्यात आली. श्रीनिवासने ‘नाळ’ चित्रपटातील ‘आई मला खेळायला जायचं...जाऊ दे नं वं’ हा संवाद ऐकवून प्रेक्षकांची मने जिंकली. मला पायलट व्हायचे होते; पण आता मला अ‍ॅक्टिंग आवडते तर अ‍ॅक्टिंगमध्येच करिअर करणार, असे श्रीनिवास म्हणाला. बबिता ताडे यांनी आपला संघर्षपूर्ण प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडला. राजदत्त सत्काराला उत्तर देताना, ‘हा पुरस्कार घेत असताना माहेरची साडी एखाद्या नववधूला मिळावी, तसे वाटत आहे,’ असे म्हणाले. डॅडी देशमुख यांच्यासोबतच्या आठवणींना राजदत्त यांनी उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणात कुळकर्णी यांनी, लघुचित्रपट बनविणे आजच्या काळाची गरज आहे. राजकीय, सामाजिक कार्य करणाऱ्यांनी यासाठी ठोस पावले उचलली पाहिजे, असे सांगितले.

‘पॉम्पलेट’ ठरला उत्कृष्ट चित्रपट

कार्यक्रमाच्या दुसºया टप्प्यात जगभरातून आलेल्या १६५ लघुचित्रपटांपैकी सर्वोत्कृष्ट १५ लघुचित्रपट प्रेक्षकांना दाखविण्यात आले. त्यामधुन आंतरराष्टÑीय स्तरावर उत्कृष्ठ ठरलेल्या अनुक्रमे प्रथम पुरस्कार शेखरबनसोड दिग्दर्शित ‘पॉम्पलेट’, द्वितीय पुरस्कार लक्ष्मीकांत सुतार दिग्दर्शित ‘अ‍ॅलर्ट बा’, तृतीय पुरस्कार कंवरपाल कंभोज दिग्दर्शित ‘इल्युजन’ या लघुचित्रपट व दिग्दर्शकांना सुप्रसिद्ध दिग्दर्शक राजदत्त व महापौर अर्चना मसने यांच्या हस्ते गौरवचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख बक्षीस २१, १५, ११ हजार देऊन गौरविण्यात आले.
सदर लघुचित्रपटांचे परीक्षण ‘वळू व देऊळ’ या सुप्रसिद्ध चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश कुळकर्णी, लेखक व दिग्दर्शक संजय शर्मा, सुप्रसिद्ध दिग्दर्शक विराग जाखड आदींनी केले. यावेळी आलेल्या उत्कृष्ट कलाकृतींपैकी अ‍ॅलर्ट बा, उत्कृष्ठ आॅडिओग्राफी, डेड लॉक उत्कृष्ट एडिटींग, थेडल उत्कृष्ट सिनेमाटोग्राफी, इनफेमस उत्कृष्ण एडीटींग (विदेशी लघुचित्रपट), पोकेमॅन नं. १ उत्कृष्ट डॉक्युमेंटरी (विदेशी लघुचित्रपट), बुरे फेज उत्कृष्ट विदेश लघु चित्रपट, प्रमोद रनखांबे (पॉम्पलेट) उत्कृषट कलाकार आदी कलाकृतींना आयोजन समितीच्यावतीने गौरविण्यात आले.

Web Title: The film works to give a new direction to the society - Sanjay Dhotre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.