अकोल्यातील विक्रांतच्या ‘ड्रेनेज’ला फिल्मफेअर नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 06:12 PM2019-03-15T18:12:50+5:302019-03-15T18:18:42+5:30
अकोला : ‘दी ड्रेनेज’च्या माध्यमातून सामान्य मानसाची कथा लघुपटाच्या माध्यमातून समाजापुढे घेऊन येणाºया अकोल्यातील युवक विक्रांत बदरखे याने मागील काही दिवसात लघुचित्रपट फेस्टीव्हलमध्ये धुमाकुळ घातला आहे.
अकोला : ‘दी ड्रेनेज’च्या माध्यमातून सामान्य मानसाची कथा लघुपटाच्या माध्यमातून समाजापुढे घेऊन येणाºया अकोल्यातील युवक विक्रांत बदरखे याने मागील काही दिवसात लघुचित्रपट फेस्टीव्हलमध्ये धुमाकुळ घातला आहे. या यशानंतर त्याच्या लघुपटाला फिल्मफेअर नामांकन मिळाले असून, अकोलेकरांसाठी ही गौरवाची बाब ठरली आहे.
बॉलीवूडमधील नवाजुद्दीन सिद्दीकी व मुकेश छाबरा यांनी घेतलेल्या लघुपटाच्या एका स्पर्धेतून विक्रांतच्या ‘दी ड्रेनेज’चा प्रवास सुरू झाला. सामान्य मानसाच्या काळजाला भिडणारी ही सोशल कथा अन् त्याच्या दिग्दर्शनाने गत वर्षभरात राज्यात धुमाकुळ घातला. मुंबई, पुणे, नाशिक, परभणी येथे झालेल्या विविध फिल्मफेस्टीव्हल सोबतच हैद्राबाद येथे झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्येही हा लघुपट हीट ठरला. दी ड्रेनेजच्या यशाने अकोल्याच्या विक्रांतला एक वेगळी ओळख दिली. त्याचा हा प्रवास येथेच थांबला नसून, फिल्मफेअरच्या निमित्ताने उंच भरारी घेतली आहे. अकोल्यातील एका साधारण कुटुंबातील युवकाची चित्रपट सृष्टीतील ही भरारी अकोलेकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
देशभरात मिळाली पसंती
देशभरात झालेल्या विविध फिल्म फेस्टीव्हलमध्ये विक्रांत बदरखे यांच्या लघुपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली. गत वर्षभरात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसोबतच मिझोरम, दिल्ली, गोवा, काश्मीर, भुवनेश्वर, केरळ या ठिकाणी देखील दी ड्रेनेज या लघुपटाला गौरवांकीत करण्यात आले.