'मैत्रेय’ आरोपींच्या जामिनावर शुक्रवारी अंतिम सुनावणी

By admin | Published: September 13, 2016 03:04 AM2016-09-13T03:04:50+5:302016-09-13T03:04:50+5:30

कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणा-या तिघा आरोपींच्या जामिनावर १६ सप्टेंबर रोजी न्यायालयात अंतिम सुनावणी होणार.

Final hearing on 'Maitreya' bail plea on Friday | 'मैत्रेय’ आरोपींच्या जामिनावर शुक्रवारी अंतिम सुनावणी

'मैत्रेय’ आरोपींच्या जामिनावर शुक्रवारी अंतिम सुनावणी

Next

अकोला, दि. १२: मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आकर्षक योजनांचे आमिष दाखवून शहरातील शेकडो नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणार्‍या तिघा आरोपींच्या जामिनावर १६ सप्टेंबर रोजी न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. न्यायालयाने यापूर्वीच आरोपींना जामीन दिल्यामुळे रामदासपेठ पोलिसांना अटक करता आली नाही. रामदासपेठ पोलीस स्टेशनमध्ये कंपनीचे संचालक वर्षा मधुसूदन सत्पाळकर (रा. विरार), जनार्दन अरविंद परूळेकर (रा. वसई) आणि शाखा व्यवस्थापक अशोक बैस (रा. शेगाव) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मैत्रेय प्रा. लि. कंपनीने शहरातील ५00 ते ६00 नागरिकांकडून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून घेतली. नागरिकांना आकर्षक योजनांचे आमिष दाखविण्यात आले. नागरिकांनी कंपनीमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केल्यानंतर भरलेल्या रकमेची मुदत पूर्ण झाली. नागरिकांनी कंपनीकडे रकमेची मागणी केली; परंतु कंपनीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. दिलेले धनादेशही वटले नाहीत. पोलिसांनी तीनही आरोपींच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू केले; परंतु आरोपी अमरावती, परभणी, नांदेड पोलिसांच्या ताब्यात होते. त्यानंतर आरोपींनी अकोला न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर करीत त्यांना अंतरिम जामीन दिला होता. आता पुन्हा आरोपींच्या जामिनावर न्यायालयात १६ सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान पोलीस कशी बाजू मांडतात. त्यावर आरोपींचा जामीन अवलंबून राहणार आहे.

Web Title: Final hearing on 'Maitreya' bail plea on Friday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.