पोलीस मुख्यालय, बाळापूर उपविभागात रंगणार अंतिम सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:14 AM2020-12-27T04:14:38+5:302020-12-27T04:14:38+5:30

स्पर्धेत जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, पोलीस निरीक्षक विलास पाटील, एसएससीचे कर्णधार भरत डिक्कर, रणजी क्रिकेटपटू रवी ठाकूर, मूनकीर ...

The final match will be played at Police Headquarters, Balapur Sub-Division | पोलीस मुख्यालय, बाळापूर उपविभागात रंगणार अंतिम सामना

पोलीस मुख्यालय, बाळापूर उपविभागात रंगणार अंतिम सामना

Next

स्पर्धेत जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, पोलीस निरीक्षक विलास पाटील, एसएससीचे कर्णधार भरत डिक्कर, रणजी क्रिकेटपटू रवी ठाकूर, मूनकीर खान, जिल्हा परिषद क्रीडा सदस्य जावेद अली, रामदास पेठ पीआय दत्तात्रय आव्हाळे, बाळापूरचे पीआय नितीन शिंदे, पीआय श्रीधर गुलसुंदरे, आरएसआय विनोद तांबे यांचे निदर्शनात सामने खेळविण्यात येत आहेत. स्पर्धेत जुने शहर पोलीस स्टेशन व बाळापूर विभाग यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना खेळविण्यात आला. यामध्ये जुने शहर संघाने प्रथम फलंदाजी करताना १२९ धावा उभारल्या. या धावांचा पाठलाग करताना बाळापूर संघाने सात विकेटने विजय मिळविला. यामध्ये नितीन याने तान विकेट, तर जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दोन विकेट घेतल्या. स्पर्धेकरिता जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापन सलीम खान, प्रशांत केदारे, स्कोरर अजय पिंपळकर, अंपायर नितीन तेलगोटे, सागर पांडे, बंटी क्षीरसागर, देवा माम्डीवार, तर कॉमेंट्री म्हणून नीलेश गाडगे, गोपाल मुकुंदे, मसूद राणा काम पाहत आहेत.

Web Title: The final match will be played at Police Headquarters, Balapur Sub-Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.