मुंबई ते नागपूर सुपर कम्युनिकेशन महामार्गाचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात.
By admin | Published: June 16, 2016 02:13 AM2016-06-16T02:13:44+5:302016-06-16T02:13:44+5:30
२६ जिल्हे जोडणार जाणार असून ३0 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
काशीनाथ मेहेत्रे/ सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): मुंबई ते नागपूर दरम्यान ७४४ किलोमीटर लांबीच्या व १२0 मीटर रुंदी असलेल्या आठपदरी सुपर कम्युनिकेशन महामार्गाच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
मुंबई ते नागपूर सुपर एक्स्प्रेस महामार्ग महाराष्ट्र प्रोस्पॅरिटी कॉरिडॉर रस्त्याच्या अनुषंगाने क्षेत्रविकास आठपदरी १00 फुटांचे डिव्हायडर इंटरचेंजवरूनच आत प्रवेश ठेवला जाणार आहे. सध्याच्या प्रचलित कायद्यानुसार ८0 किलोमीटर प्रतितास वेगाने मुंबई ते पुणे दरम्यान गाड्या धावतात; परंतु या महामार्गावर कायद्यात बदल करून वेगर्मयादा १५0 किमी प्रतितास करण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई ते नागपूर जाण्यासाठी फक्त सहा तास लागणार आहे तसेच डिव्हायडरमधून गॅस पाइप लाइन, ऑप्टिकल फायबर नेटवर्क व इतर अनेक सुविधा करण्यात येणार आहेत. या रस्त्यावर २२ ठिकाणी इंटरचेंजसाठी १२५ हेक्टर जमीन लागणार आहे. तेथेच रस्त्याच्या बाजूला टोल नाके राहणार आहेत. सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्यात असून निविदा प्रक्रिया ऑगस्ट २0१६ पासून सुरू होईल व डिसेंबर २0१६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊन सहा टप्प्यांत २0१९ मध्ये काम पूर्ण होणार आहे. या प्रकल्पासाठी भूमी संपादन कायद्यानुसार न घेता, ह्यआंध्र प्रदेश पॅटर्नह्णनुसार घेतली जाणार आहे. यामध्ये (लँड पूल) शेतकर्यांनी स्वत: जमीन विनामोबदला द्यायची असून, त्या बदल्यात ज्या ठिकाणी शासन शहर विकसित करणार आहे, त्या शहराच्या ठिकाणी मोबदला म्हणून अशा शेतकर्यांना २0, २५ टक्क्याचे विकसित भूखंड देण्यात येणार आहेत. जे शेतकरी स्वत: जमीन देणार नाही, त्यांच्या जमिनी महामार्ग अँक्टनुसार संपादित करण्यात येणार आहेत; मात्र त्यांना विकसीत भूखंडाचा लाभ घेता येणार नाही. ज्या शेतकर्यांच्या जमिनी या प्रकल्पामध्ये गेल्या, त्या बागायतदार शेतकर्यांना ५0 ते ६0 हजार प्रतिहेक्टर वार्षिक उदरनिर्वाहासाठी देण्यात येणार आहे, असेही या प्रकल्पामध्ये प्रस्तावित आहे.
* ३0 हजार हेक्टर जमीन, ३0 हजार कोटींचा प्रोजेक्ट.
* मुंबई ते नागपूर ७४४ किलोमीटर अंतराचा १२0 मीटर रुंद आठपदरी मार्ग.
* कायदा बदलून ताशी १५0 किलोमीटर वेगाची र्मयादा.
* विमान उतरविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हाय-वेवर धावपट्टी.
* सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात, ऑगस्टपासून टेंडर प्रक्रिया सुरू होणार.
* डिसेंबर २0१६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात, सहा टप्प्यांमध्ये काम सुरू होणार असून, २0१९ पर्यंत काम पूर्ण होईल.
* सुपर कम्युनिकेशन हाय-वेसाठी ३0 हजार हेक्टर जमीन लागणार.
* हाय-वेवर २६ जिल्हे जोडले जाणार असून, २२ ठिकाणी इंटरचेंज पॉइंट राहणार