किशोर खत्री हत्याकांडचा अंतीम निकाल गुरुवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 05:56 PM2018-09-24T17:56:26+5:302018-09-24T17:56:34+5:30
अकोला : शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात गुरुवार, २७ सप्टेंबर रोजी लागणार आहे.
अकोला : शहरातील प्रसिद्ध व्यवसायी तथा उद्योजक किशोर खत्री हत्याकांड प्रकरणाचा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अ. सा. जाधव यांच्या न्यायालयात गुरुवार, २७ सप्टेंबर रोजी लागणार आहे. हा अंतीम निकाल ११ सप्टेंबर रोजी लागणार होता, मात्र त्यानंतर २४ सप्टेंबर ही तारीख देण्यात आली होती.
खोलेश्वर परिसरात निर्माणाधीन असलेल्या बालाजी मॉलच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून किशोर खत्री यांची सोमठाणा शेत शिवारामध्ये ३ नोव्हेंबर २०१५ रोजी बंदुकीच्या गोळ्या झाडून व धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली होती. किशोर खत्री यांचे बंधू दिलीप खत्री यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रणजितसिंह चुंगडे, अंकुश चंदेल व राजू मेहेर व निलंबित पोलीस कर्मचारी जस्सी ऊर्फ जसवंत सिंह चौहान यांच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून, त्यांना अटक केली होती. मंगळवार, ११ सप्टेंबर व त्यानंतर २४ सप्टेंबर अंतीम निकालाची तारीख देण्यात आली होती. सोमवारी न्यायालयाने या खटल्याचा अंतीम निकाल गुरुवार २७ सप्टेंबर रोजी लागणार असल्याचे स्पष्ट केले.