अकोला जिल्ह्यातील १४६ ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 11:36 IST2021-02-22T11:36:36+5:302021-02-22T11:36:43+5:30
Grampanchayat News १४६ ग्रामपंचायतींच्या २८५ रिक्त पदांसाठी लवकरच पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

अकोला जिल्ह्यातील १४६ ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
अकोला: जिल्ह्यातील १४६ ग्रामपंचायतींच्या २८५ रिक्त पदांसाठी लवकरच पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी या ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी १८ फेब्रुवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जिल्ह्यात १४६ ग्रामपंचायतींच्या २८५ ग्रामपंचायत सदस्यांची पदे रिक्त आहेत. त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींची १२, अकोट तालुक्यात ११ ग्रामपंचायतींची २५, मूर्तिजापूर तालुक्यात ४९ ग्रामपंचायतींची ११६, अकोला तालुक्यात १३ ग्रामपंचायतींची २३, बाळापूर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींची २६, बार्शिटाकळी तालुक्यात २६ ग्रामपंचायतींची ५४ व पातूर तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींची २९ पदे रिक्त आहेत. ग्रामपंचायतींच्या या रिक्त पदांसाठी संबंधित ग्रामपंचायतींची पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यातील १४६ ग्रामपंचायतींच्या प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम राबविण्यात आला असून, अंतिम मतदार यादी १८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यातील तहसील कार्यालये, पंचायत समित्या व संबंधित ग्रामपंचायतींच्या ठिकाणी मतदार यादी प्रशासनामार्फत प्रसिद्ध करण्यात आली आहे.