जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी जाहीर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:34 AM2020-12-15T04:34:48+5:302020-12-15T04:34:48+5:30

एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, निवडणुकीची आचारसंहिता ११ डिसेंबरपासून ...

Final voter list of 225 gram panchayats in the district announced! | जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी जाहीर!

जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी जाहीर!

Next

एप्रिल ते डिसेंबरपर्यंत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, निवडणुकीची आचारसंहिता ११ डिसेंबरपासून लागू करण्यात आली. त्यामध्ये जिल्ह्यातील मुदत संपलेल्या २२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १४ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतींची अंतीम मतदार यादी जाहीर करण्यात आली. तहसीलदारांकडून जिल्ह्यातील सातही तालुक्यात तहसील कार्यालये, पंचायत समिती व संबंधित ग्रामपंचायत कार्यालये इत्यादी ठिकाणी ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची अधिसूचना जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून १५ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

मतदार यादी जाहीर केलेल्या

ग्रामपंचायतींची अशी आहे संख्या!

तालुका ग्रा.पं.

अकोला ३६

अकोट ३८

बाळापूर ३८

बार्शीटाकळी २७

पातूर २३

तेल्हारा ३४

मूर्तिजापूर २९

........................................

एकूण २२५

निवडणूक निर्णय

अधिकाऱ्यांची नेमणूक!

जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सातही तहसीलदारांकडून १४ डिसेंबर रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली.

जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १४ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतींची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकांसाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक तहसीलदारांकडून करण्यात आली आहे. तसेच या निवडणुकीची अधिसूचना १५ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील तहसीलदारांकडून जाहीर केली जाणार आहे.

संजय खडसे

निवासी उपजिल्हाधिकारी

Web Title: Final voter list of 225 gram panchayats in the district announced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.