अखेर कृषी अधिकारी, कंपनीचे प्रतिनिधी पोहोचले शेताच्या बांधावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:14 AM2021-07-10T04:14:25+5:302021-07-10T04:14:25+5:30
दिग्रस बु: पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील शेतकरी गोपाल गवई यांनी शेतात सोयाबीनची पेरणी केली होती; मात्र बियाणे ...
दिग्रस बु: पातूर तालुक्यातील दिग्रस बु. येथील शेतकरी गोपाल गवई यांनी शेतात सोयाबीनची पेरणी केली होती; मात्र बियाणे उगवले नसल्याने शेतकरी चिंतित सापडला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच तालुका कृषी अधिकारी व कंपनीच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच पंचनामा केला.
दिग्रस बु. येथील शेतकरी गोपाल त्र्यंबक गवई यांनी सस्ती येथील कृषी सेवा केंद्रातून बियाणे विकत घेऊन दिग्रस खुर्द येथील गट क्रमांक २०१, २०२, १३८, ३२ या १७ एकरावर ट्रॅक्टरद्वारे पेरणी केली; मात्र बियाणे उगवले नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता. शेतकऱ्याने कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क केला; मात्र दखल न घेतल्याने शेतकरी गोपाल गवई यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच संबंधित विभागाने दखल घेऊन शेतकरी गोपाल गवई यांच्या शेतात पाहणी केली. यावेळी तालुका कृषी अधिकारी डी. एस. शेटे, प्रभारी मंडळ कृषी अधिकारी जी. एम. डिके, कृषी सहायक अनिल सुरवाडे, कृषी सहायक शीतल देवकर, कृषी सेवा केंद्राचे दुकानदार नागापुरे, बियाणे कंपनीचे प्रतिनिधी वऱ्हाडे, इंगळे, देवानंद गवई, गोविंद गवई, शेतकरी गोपाल गवई, निसर्ग गवई, सस्ती शिवारात असलेले शेजारील पंजाब अंभोरे, बाळू सुखदेव अंभोरे आदी शेतकरी उपस्थित होते. (फोटो) (बातमीचा फोटो)