..अखेर दोन्ही आरोपी पोलिसांना शरण!

By admin | Published: August 18, 2015 01:30 AM2015-08-18T01:30:37+5:302015-08-18T01:30:37+5:30

युवकाचा लैंगिक छळ : गोयनका, रूंगटा यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

Finally, both the accused surrendered to the police! | ..अखेर दोन्ही आरोपी पोलिसांना शरण!

..अखेर दोन्ही आरोपी पोलिसांना शरण!

Next

अकोला : रोजंदारी युवकास कायमस्वरूपी नोकरी देण्याच्या नावाखाली त्याचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेले अकोल्यातील भारतीय सेवा सदन या शिक्षणसंस्थेचे माजी अध्यक्ष निरंजनकुमार गोयनका आणि जुगलकिशोर रुंगटा यांनी सोमवारी सिव्हिल लाइन्स पोलिसांसमोर शरणागती पत्करली. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. भारतीय सेवा सदनद्वारा संचालित राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहात रोजंदारीवर काम करणार्‍या पीडित युवकाने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याला कायमस्वरूपी नोक रीचे आमिष दाखवून निरंजनकुमार गोयनका व जुगलकिशोर रुंगटा यांनी त्याचा आठ वर्ष (२00८ ते २0१५) लैंगिक छळ केला; मात्र नोकरीत कायम केले जात नसल्याचे पाहून युवकाने आरोपींच्या अश्लील चाळय़ांची चित्रफीत तयार केली. त्यानंतर युवकाने दिलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी गोयनका व रुंगटा या दोघांविरुद्ध लैंगिक छळाचे गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल झाल्यानंतर दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती; मात्र अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.एन. तांबी यांच्या न्यायालयाने १५ जुलै रोजी त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर दोन्ही आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे अर्ज सादर केला. हा अर्ज आरोपींनी १0 ऑगस्ट रोजी मागे घेतला; मात्र उच्च न्यायालयाने आरोपींना २४ ऑगस्टपपर्यंत अटक न करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यामुळे आरोपींच्या अटकेसाठी पोलीस २४ ऑगस्टपर्यंतची प्रतिक्षा करीत असताना, सोमवारी सकाळी १0 वाजता रुंगटा व गोयनका सिव्हिल लाइन्स पोलिसांना शरण आले. दोन्ही आरोपींना सोमवारी दुपारी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस. एस. जांभळे यांच्या न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Finally, both the accused surrendered to the police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.