अखेर सिमेंट रस्त्यासाठी मुहूर्त सापडला!

By admin | Published: October 14, 2015 01:18 AM2015-10-14T01:18:46+5:302015-10-14T01:18:46+5:30

दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर लक्कडगंज रस्त्याचा झाला ‘श्रीगणेशा’.

Finally, the cement was found in the muhurat | अखेर सिमेंट रस्त्यासाठी मुहूर्त सापडला!

अखेर सिमेंट रस्त्यासाठी मुहूर्त सापडला!

Next

अकोला: रस्ते दुरुस्तीसाठी दोन वर्षांपूर्वी महापालिकेला प्राप्त १५ कोटींच्या अनुदानातून प्रशासनाने १८ रस्ते प्रस्तावित केले. दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर का होईना, अखेर सिमेंट रस्त्यासाठी मुहूर्त सापडला. मंगळवारी विरोधी पक्षनेता साजीद खान यांच्या मातोश्री माजी नगरसेविका सलमाबी मन्नान खान यांच्या हस्ते टिळक रोड ते माळीपूरा ते तपे हनुमान मंदिरपर्यंत रस्त्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. मनपाला प्राप्त १५ कोटींच्या अनुदानातून सात सिमेंट रस्त्यांची कामे प्रस्तावित आहेत. सिमेंट रस्त्यांचे रूंदीकरण करण्याचा निर्णय मनपा आयुक्त अजय लहाने यांनी घेतला असून त्यापूर्वी रस्त्यालगतचे विद्यूत पोल,रोहित्र हटविण्यासाठी महावितरण कंपनीचे सहकार्य घेतल्या जात आहे. विरोधी पक्षनेता साजीद खान यांच्या प्रभाग क्र.१२ अंतर्गत येणार्‍या माळीपूरा ते लक्कडगंज ते तपे हनुमान मंदिरपर्यंतच्या रस्त्यालगतचे विद्यूत पोल व रोहित्र हटविल्यानंतर अखेर मंगळवारी रस्त्याच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला.  

Web Title: Finally, the cement was found in the muhurat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.