अखेर जिल्ह्याला पीक विम्याचे १३४ कोटी मंजूर

By admin | Published: June 24, 2016 01:33 AM2016-06-24T01:33:10+5:302016-06-24T01:33:10+5:30

विभागासाठी ६८६ कोटी मंजूर ; दुष्काळग्रस्त शेतक-यां मिळणार दिलासा.

Finally, the grant of 134 crore of the crop insurance to the district | अखेर जिल्ह्याला पीक विम्याचे १३४ कोटी मंजूर

अखेर जिल्ह्याला पीक विम्याचे १३४ कोटी मंजूर

Next

अकोला: अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांला शासनाने पीक विम्याच्या नुकसानभरपाईपोटी ६८६ कोटी रू पये मंजूर केले असून, जिल्ह्यात खरीप हंगाम सन २०१५-१६ मधील विविध पिकांसाठी अकोला जिल्ह्याला १३४ कोटी २८ लाख ५९ हजार रुपये नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. नुकसानभरपाईची रक्कम शासनाकडून बँकेमार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. यामुळे जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
आकोट तालुक्यामध्ये कापूस, ज्वारी, सोयाबीन, उडीद, मूग. तेल्हारा तालुक्यामध्ये सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी व तीळ. बाळापूर तालुक्यामध्ये कापूस, सोयाबीन, उडीद, मूग, ज्वारी व तीळ. पातूर तालुक्यामध्ये सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग व तीळ. अकोला तालुक्यामध्ये ज्वारी, कापूस, तूर, सोयाबीन, उडीद, मूग व तीळ. बार्शीटाकळी तालुक्यामध्ये तूर, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग व तीळ, तर मूर्तिजापूर तालुक्यामध्ये सोयाबीन व मूग या पिकांना शासनाकडून नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. सदर नुकसानभरपाईची रक्कम शासनाकडून बँकेमार्फत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
पीक विम्यापोटी आकोट २४ कोटी २९ लाख २६ हजार ८१०, तेल्हारा १४ कोटी ८६ लाख ३३ हजार ५०७, बाळापूर तालुका १७ कोटी १४ लाख ७७ हजार ४०३, पातूर तालुका १७ कोटी ९० लाख ६५ हजार ५४०, अकोला तालुका ३४ कोटी ५३ लाख ८० हजार ९९९, बार्शीटाकळी तालुका ८ कोटी ८५ लाख ६५ हजार ४३१, तर मूर्तिजापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ६ कोटी ६८ लाख ९ हजार ८४२ रुपये विम्याची रक्कम मंजूर करण्यात आली आहे. तालुकानिहाय मंजूर पीक विमा रक्कम एकूण १३४ कोटी २८ लाख ५९ हजार ५३२ रुपये आहे. ही रक्कम लवकरच प्राप्त होणार असून, संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.
दुष्काळी परिस्थितीत संकटात सापडलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पीक विमा रकमेचा लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा केली जात होती. दरम्यान, शासनामार्फत पीक विम्याची रक्कम मंजूर करण्यात आल्याने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आधार मिळणार आहे.

Web Title: Finally, the grant of 134 crore of the crop insurance to the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.