...अखेर चार प्रमुख रस्त्यांवर पथदिवे उभारण्याचा मार्ग प्रशस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 05:26 PM2020-12-18T17:26:04+5:302020-12-18T17:26:12+5:30

Akola Municipal Corporation News चार प्रमुख रस्त्यांवर विद्युत खांब उभारण्यासाठी ३ काेटी ३८ लाख निधी मंजूर केला आहे.

... finally paving the way for the erection of streetlights on four major roads | ...अखेर चार प्रमुख रस्त्यांवर पथदिवे उभारण्याचा मार्ग प्रशस्त

...अखेर चार प्रमुख रस्त्यांवर पथदिवे उभारण्याचा मार्ग प्रशस्त

Next

अकाेला : शहरातील प्रमुख चार मार्गांवर मागील दाेन वर्षांपासून अंधाराची समस्या कायम आहे. प्रशासनाकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे नेकलेस राेड, टिळकराेड, खाेलेश्वर मार्ग व मलकापूर मार्गावर एलइडी पथदिवे उभारलेच नाहीत. या व्यतिरिक्त गाेरक्षणराेडवरील भाेले किराणा ते क्रांती चाैकापर्यंंतही अंधार आहे. याबाबीचा उहापाेह झाल्यानंतर मनपा प्रशासनाने सुवर्णजयंती नगराेत्थान याेजनेतून चार प्रमुख रस्त्यांवर विद्युत खांब उभारण्यासाठी ३ काेटी ३८ लाख निधी मंजूर केला आहे. यामध्ये मलकापूर रस्त्याचा समावेश नाही.

तत्कालीन भाजप शिवसेना युतीच्या कालावधीत एलइडी पथदिव्यांसाठी स्थानिक लाेकप्रतिनिधींच्या मागणीनुसार राज्य शासनाने दहा काेटींची निधी मंजूर केला हाेता. यामध्ये महापालिकेच्या चाैदाव्या वित्त आयाेगातून दहा काेटींचा निधी जमा करण्यात आला. एकूण २० काेटी रुपयांतून पाेल उभारणे व त्यावर एलइडी पथदिवे लावण्यासाठी पुणे येथील मे. राॅयल इलेक्ट्रिकल कंपनीची नियुक्ती करण्यात आली. यादरम्यान, केंद्र शासन प्रमाणित इइएसएल कंपनीला संपूर्ण शहरातील महापालिकेच्या खांबांवर एलइडी पथदिवे लावण्यासाठी नियुक्त करण्यात आले. इइएसएलमार्फत सुमारे २८ काेटी रुपयांतून पथदिवे लावण्याचे काम प्रगतिपथावर आहे. असे असले तरी चार ते पाच प्रमुख रस्त्यांवर पथदिवे उभारणीसाठी विद्युत पाेल नसल्यामुळे एलइडी लाइट लावण्यात आले नसल्याचे चित्र आहे. विद्युत पाेल उभारणीसाठी मनपाकडे सुवर्णजयंती नगराेत्थान याेजनेतून निधी उपलब्ध झाला असून, यातून ३ काेटी ३८ लाख रुपयांची कामे मंजूर करण्यात आली आहेत.

 

या रस्त्यांवर उभारणार विद्युत पाेल

शहरातील नेकलेसराेड, निमवाडी लक्झरी बसस्टॅंड ते सिटी काेतवाली, सिटी काेतवाली ते थेट छत्रपती शिवाजी महाराज पार्क, गाेरक्षणराेडवरील भाेले किराणा ते क्रांती चाैक या प्रमुख रस्त्यांच्या दुभाजकांमध्ये एलइडी पथदिव्यांसाठी विद्युत पाेलची उभारणी केली जाणार आहे.

 

 

असे केले नियाेजन

मुख्य चार रस्त्यावरील दुभाजकांमध्ये पथदिव्यांचे खांब उभारणे- १ काेटी १३ लाख रुपये

महावितरणच्या दाेन विद्युत खांबात जास्त अंतर असल्याने अशा ठिकाणी नवीन खांब उभारणे- १ काेटी ६८ लाख ५० हजार

मुख्य रस्त्यावर पथदिव्यांचे खांब उभारणे- ५७ लाख ३२ हजार रुपये

Web Title: ... finally paving the way for the erection of streetlights on four major roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.