अखेर वाडेगाव येथील वीजपुरवठा सुरळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:18 AM2021-03-15T04:18:03+5:302021-03-15T04:18:03+5:30
वाडेगाव: पातूर-बाळापूर मार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामात अडथळा आणणारे झाडे तोडण्यात येत आहेत. झाडे ...
वाडेगाव: पातूर-बाळापूर मार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे या मार्गाच्या कामात अडथळा आणणारे झाडे तोडण्यात येत आहेत. झाडे तोडल्यामुळे झाडाची फांदी वीजतारांवर पडल्यामुळे वाडेगाव येथील काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच महावितरणने दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत केला आहे.
वाडेगाव येथील वाॅर्ड क्र १ मधील भौंडेवाडी, शिव चौक, पल्हाडे लेआऊट, गजानन वाडी, शिक्षक काॅलनी आदी भागातील वीजपुरवठा गुरुवारपासून खंडित झाला होता. याकरिता शुक्रवारपासून ग्राम पंचायत कर्मचारी तांत्रिक अडचण काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. यासाठी सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच सुनील घाटोळ, सदस्य सचीन धनोकार, अंकुश शहाणे, सुनील मानकर, शेख चांद, राजकुमार अवचार, प्रकाश मसने यांच्यासह महावितरणचे कर्मचारी कार्यरत आहेत. अखेर शनिवारी रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आल्याची माहिती सरपंच तायडे यांनी दिली. (फोटो)