अखेर पिंजर योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 01:12 PM2019-01-12T13:12:55+5:302019-01-12T13:12:57+5:30

अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पेयजल योजनेतील निधी खर्चात अनियमितता केल्याप्रकरणी पिंजर योजनेशी संबंधित जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी, समितीच्या अध्यक्ष, सचिवावर कारवाई प्रस्तावित करण्यात आाल्याची माहिती आहे.

 Finally, the proposal to take action against the culprits of coruption | अखेर पिंजर योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव

अखेर पिंजर योजनेतील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईचा प्रस्ताव

Next

अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत पेयजल योजनेतील निधी खर्चात अनियमितता केल्याप्रकरणी पिंजर योजनेशी संबंधित जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता, बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी, समितीच्या अध्यक्ष, सचिवावर कारवाई प्रस्तावित करण्यात आाल्याची माहिती आहे. नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी रुजू झाल्यानंतर ती होण्याची शक्यता आहे.
भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत २००८-०९ मध्ये पिंजर येथे पाणी पुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले. त्याची अंदाजित किंमत २ कोटी ५५ लाख ८४ हजार ४०० रुपये होती. त्यातून योजनेचे काम करण्यात आले; मात्र पाणी पुरवठा बंद पडला. त्याचवेळी आधीच्या निधीतून ६६ लाख ७३ हजार ६५७ रुपये शिल्लक होते. ती रक्कम पिंजर ग्रामपंचायतने २०१५-१६ मध्ये टंचाईच्या कामासाठी खर्च केली. त्यासाठी ५० लाखांच्यावर कामाची किंमत असेल, तर जलसंधारण समिती सभेची मंजुरी आवश्यक आहे. ती न घेताच काम करण्यात आले. प्रशासकीय मंजुरी घेतली नाही. कामाचे ई-टेंडरिंग केले नाही, तसेच कामाची मोजमाप पुस्तिका तयार न करताच कंत्राटदाराला देयकही अदा केले. ही संपूर्ण अनियमितता असल्याने याप्रकरणी तक्रारीवरून चौकशी करण्यात आली. तेल्हाराचे सहायक गटविकास अधिकारी यांनी अहवाल डिसेंबर २०१६ मध्येच सादर केला. त्यातील दोषींवर अद्यापही कारवाई झाली नाही. याप्रकरणी दुर्लक्ष केल्याने ही अनियमितता घडल्याचे पुढे आले. या अनियमिततेसाठी तत्कालीन कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपुलवार यांनाही जबाबदार धरण्यात आले. काम सुरू करण्यापूर्वी शासनाची मंजुरी न घेणे, ई-निविदा न करणे, खासगी उद्भवातून पाणी घेताना शहानिशा न करणे, या मुद्यांचे स्पष्टीकरण कोपुलवार यांना सात दिवसांत मागविण्यात आले. ते न मिळाल्यास प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्याची नोटीस त्यांना देण्यात आली होती. सोबतच चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतरही दोषींवर कारवाई न केल्याने बार्शीटाकळीचे गटविकास अधिकारी संदीप भंडारे यांनाही नोटीस देण्यात आली. त्यानंतर पिंजरच्या ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने ई-टेंडरिंग न करणे, कामाची मोजमाप पुस्तिका तयार होण्यापूर्वीच लाखो रुपये कंत्राटदाराला देणे, याप्रकरणी समिती अध्यक्ष, सचिवावर वसुलीसह फौजदारी कारवाई प्रस्तावित केल्याची माहिती आहे. त्यावर आता लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

Web Title:  Finally, the proposal to take action against the culprits of coruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.