अखेर पांढुर्णा येथे टाकला मुरुम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:14 AM2021-07-19T04:14:18+5:302021-07-19T04:14:18+5:30
पांढुर्णा: पातूर तालुक्यातील पांढुर्णा येथे दलित वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना नाहक ...
पांढुर्णा: पातूर तालुक्यातील पांढुर्णा येथे दलित वस्तीमध्ये घाणीचे साम्राज्य झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे नागरिकांना ये-जा करताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत होते, तर दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडले होते. याबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित करताच, संबंधित विभागाला जाग येऊन त्या ठिकाणी मुरुम टाकण्यात आला आहे.
पांढुर्णा येथे दलीत वस्तीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत वारंवार माहिती देऊनही याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत होते. याबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित करताच, ग्रामपंचायत प्रशासनाला जाग येऊन दलित वस्तीमध्ये सरपंच सुभाष शेळके, सामाजिक कार्यकर्ते किशोर देवकते यांनी पुढाकार घेऊन पाणी साचलेल्या ठिकाणी मुरुम टाकला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नीलेश सोनोने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.