अखेर आलेगाव-नवेगाव रस्त्याची डागडुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:14 AM2020-12-09T04:14:17+5:302020-12-09T04:14:17+5:30
पांढर्णा: पातूर तालुक्यातील अगदी ग्रामीण व दुर्गम भाग आलेगाव-नवेगाव-डोणगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत ‘लोकमत’ने ७ डिसेंबर रोजी वृत्त ...
पांढर्णा: पातूर तालुक्यातील अगदी ग्रामीण व दुर्गम भाग आलेगाव-नवेगाव-डोणगाव रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत ‘लोकमत’ने ७ डिसेंबर रोजी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत, सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराकडून खड्डे बुजविण्याचे काम सुरू केले आहे.
आलेगाव-नवेगाव-डोणगाव रस्त्याची ठिकठिकाणी दुरवस्था झाली असून, रस्त्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले होते. रस्ता दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. अखेर ‘लोकमत’ने ७ डिसेंबर रोजी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित अधिका-यांनी दखल घेऊन यांनी रोडच्या कामाची पाहणी करून व संबंधित कंत्राटदाराला आलेगाव ते नवेगाव मार्गे डोणगाव रस्त्याचे सर्व लहान-मोठे खड्डे बुजविण्यास बजावले आहे. रस्त्याची दुरुस्ती कामाला सुरुवात झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये डांबर व गिट्टी टाकून खड्डे बुजविण्यात येत आहेत. यामुळे वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले.
फोटो: