अखेर पाटबंधारे विभागामार्फत कॅनॉलची दुरुस्ती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:17 AM2021-03-14T04:17:49+5:302021-03-14T04:17:49+5:30
लोकमत इम्पॅक्ट निहिदा : महान पाटबंधारे विभागाचा कारभार ढेपळल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे ...
लोकमत इम्पॅक्ट
निहिदा : महान पाटबंधारे विभागाचा कारभार ढेपळल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच पाटबंधारे विभागामार्फत कॅनॉलची दुरुस्ती केल्याने तसेच पाणी पुरवठा सुरुळीत केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. परिसरात सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्याने उन्हाळी पिकांची पेरणी वाढली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी भुईमुगाला अधिक पसंती दिली आहे.
महान पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात अधिकारी सतत गैरहजर असणे, तसेच पाटबंधारे विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या तलाव व प्रकालपातून सिंचनासाठी पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या कॅनॉलची नादुरुस्ती यामुळे शेतकरी वैतागले होते. याबाबत ‘लोकमत’ने बातमी प्रकाशित करताच महान पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या आहेत. कॅनॉलची दुरुस्ती केल्याने पिंजर परिसरातील कानडी घोंगा, सावरखेड, पी, हांडे, मोझरी खुर्द, ईसापूर, जनुना, घोटा, मोरहळ, पी, चांभारे, इत्यादी तलाव, बंधाऱ्यातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आहे. यासाठी महान पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता नीलेश घ्यारे आदी प्रयत्न करीत आहेत. (बातमीचा फोटो)
उन्हाळी पिकांची पेरणी वाढली!
कॅनॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळत असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन, उन्हाळी भुईमुगाची पेरणी केली आहे. तसेच परिसरात भाजीपाला पिकांचाही मोठ्या प्रमाणात पेरा वाढला आहे.