अखेर तारीख ठरली, आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया

By नितिन गव्हाळे | Published: April 15, 2024 08:50 PM2024-04-15T20:50:16+5:302024-04-15T20:55:25+5:30

जिल्ह्यातील १२१४ शाळांमध्ये १३ हजारांवर जागा

Finally the date is decided, RTE exam from today | अखेर तारीख ठरली, आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया

अखेर तारीख ठरली, आजपासून आरटीई प्रवेश प्रक्रिया

अकोला: जिल्ह्यातील १३६० शाळांपैकी १२१४ शाळांनी आरटीईची ऑनलाइन नोंदणी पूर्ण केली. अकोला जिल्ह्याने शाळा नोंदणीचे उद्दिष्ट १०० पूर्ण केल्यानंतरही पालकांना प्रवेशासाठी प्रतीक्षा करावी लागत होती. अखेर आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तारीख ठरली असून, १६ ते ३० एप्रिल या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

वंचित व दुर्बल घटकांतील मुला-मुलींसाठी शिक्षण हक्क कायदा बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अधिनियम २००९ अन्वये कलम १२ (एफ) (सी) नुसार व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित व दुर्बल घटकांतील मुला-मुलींसाठी राखीव ठेवण्याची तरतूद शासनाने केली आहे. त्यानुसार अकोला जिल्ह्यातील आरटीई पात्र शाळांना नोंदणी बंधनकारक होती. त्यानुसार आरटीई पात्र शाळांनी नोंदणी केली आहे. प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी आरटीई ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याबाबतचे पत्र सोमवारीच जारी केले असून, त्यानुसार १६ एप्रिलपासून आरटीईअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणी केलेल्या १२१४ शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
.......................................

आरटीई नाेंदणीकृत अशा आहेत, शाळा

अकोला मनपा- ३६
अकोला पं. स. - २९९

अकोट- १९७
बाळापूर- १३८

बार्शीटाकळी- १४६
मूर्तिजापूर- १६४

पातूर- ११४
तेल्हारा- १२०

...................................................
जिल्ह्यात १३ हजार ७३२ जागा आहेत. या जागांसाठी आरईटीच्या ऑनलाइन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला १६ एप्रिलपासून सुरुवात होत आहे. पालकांनी ऑनलाइन अर्ज करावेत.
-रतनसिंग पवार, शिक्षणाधिकारी प्राथमिक

Web Title: Finally the date is decided, RTE exam from today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला