अखेर ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 01:59 AM2017-09-08T01:59:26+5:302017-09-08T02:00:09+5:30

अकोला : जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोर   प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना ४५ टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश  अखेर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी  गुरुवारी दिला. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा  मिळाला आहे.

Finally, water supply through 61 tankers to tankers! | अखेर ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा!

अखेर ६१ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा!

Next
ठळक मुद्देजिल्हाधिकार्‍यांचा आदेश ‘लोकमत’ ने केला पाठपुरावाटंचाईग्रस्त गावांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यातल्या खारपाणपट्टय़ातील खांबोर   प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीटंचाईग्रस्त ६१  गावांना ४५ टॅकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा आदेश  अखेर जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी  गुरुवारी दिला. त्यामुळे पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा  मिळाला आहे.
यावर्षी अकोला शहरासह खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा  योजनेंतर्गत ६४ गावांना पाणीपुरवठा करणार्‍या महान ये थील काटेपूर्णा धरणात अत्यल्प जलसाठा उपलब्ध  आहे. त्यामुळे या धरणातील जलसाठा अकोला शहर  पाणीपुरवठा योजनेसाठी आरक्षित असून, खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी धरणातून पाणीपुरवठा  बंद करण्यात आला आहे. 
या पृष्ठभूमीवर  खांबोराजवळील उन्नई बंधार्‍यातून  खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना  आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत होता; परंतु  उन्नई बंधार्‍यातील पाणी संपल्याने खांबोरा प्रादेशिक  पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांचा पाणीपुरवठा गत ७  ऑगस्टपासून बंद करण्यात आला आहे. आता या  पाणीटंचाईग्रस्त ६१ गावांना ४५ टँकरद्वारे पाणीपुरवठा  सुरू करण्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिकुमार  पाण्डेय यांनी ७ सप्टेंबर रोजी दिला. 
टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याने  पाणीटंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला आहे. खांबोरा  प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत गावांमधील  जलसंकटाच्या मुद्यावर गत ऑगस्टमध्ये ‘लोकमत’मध्ये  सातत्याने वृत्त प्रकाशित करण्यात आले होते, हे येथे  उल्लेखनीय.

‘या’ गावांना होणार टँकरद्वारे पाणीपुरवठा!
आपातापा, खोबरखेड, जलालाबाद, मजलापूर, आख तवाडा, गोणापूर, शामाबाद, सुलतान अजमपूर, आपोती  खुर्द, आपोती बु., कौलखेड गोमासे, मारोडी, दापुरा,  अंबिकापूर, अनकवाडी, घुसर, घुसरवाडी, कासली बु.,  कासली खुर्द, लाखोंडा बु., लाखोंडा खुर्द, म्हातोडी,  नवथळ, खेकडी, परितवाडा, आगर, वल्लभनगर, हिंगणा  तामसवाडी, वैराट, गांधीग्राम, निराट, गोपालखेड, राजा पूर, धामणा, गोत्रा, पाळोदी, सांगवी खुर्द, सांगवी बु.,  फरमादाबाद, निंभोरा, कंचनपूर, अलियाबाद, बादला पूर, सांगळूद बु., सांगळूद खुर्द, वरोडी, वाकी, नावखेड,  धोतर्डी, दहीगाव, बहिरखेड, रामगाव, गोंदापूर, पळसो  बु., बहादरपूर, कौलखेड जहॉगीर, बोरगाव मंजू, नि पाणा, सुकळी व कानशिवणी इत्यादी ६१ गावांना  टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

Web Title: Finally, water supply through 61 tankers to tankers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.