नाम फाउंडेशनतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:14 AM2021-07-15T04:14:48+5:302021-07-15T04:14:48+5:30

ही मदत नाम फाउंडेशनचे विदर्भ व खानदेशचे समन्वयक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनात व नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक माणिक शेळके ...

Financial assistance to a suicidal farmer family by Naam Foundation | नाम फाउंडेशनतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत

नाम फाउंडेशनतर्फे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत

Next

ही मदत नाम फाउंडेशनचे विदर्भ व खानदेशचे समन्वयक हरीश इथापे यांच्या मार्गदर्शनात व नाम फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक माणिक शेळके यांच्या हस्ते व श्री गुरुदेव सेवा मंडळाचे ज्येष्ठ प्रचारक डॉ. रामेश्वर बरगट, उपसरपंच प्रशांत नागे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली.

आतापर्यंत नाम फाउंडेशनने विदर्भ व मराठवाडा या भागात आठ गावे दत्तक घेतली असून, अनेक जिल्ह्यांमध्ये जलसंधारण, तलाव खोलीकरण, नद्यांमधील गाळ उपसणे अशी अनेक समाजोपयोगी कामे लोकसहभागातून केली आहेत.

फोटो:

४० विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना शिलाई मशीन, शेळ्या व इतर रोजगाराचे साहित्य मदत म्हणून देण्यात येते. आतापर्यंत अकोला जिल्ह्यातील ४० शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले असून, ३० कुटुंबांना पंधरा हजार रुपयांचे धनादेश वितरित करण्यात आले आहे.

Web Title: Financial assistance to a suicidal farmer family by Naam Foundation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.