मंदिरांवर अवलंबून असणाऱ्यांचे आर्थिक ‘देऊळ पाण्यात’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 10:58 AM2020-10-23T10:58:46+5:302020-10-23T11:03:53+5:30

Akola, Temple शहरातील ७० मंदिरांवर अवलंबून असलेल्या पुजारी, फूल व्यावसायिक, प्रसादाच्या दुकानदारांवर मंदिर बंद असल्याने उपासमार आली आहे.

The financial crisis on of those who depend on temples! | मंदिरांवर अवलंबून असणाऱ्यांचे आर्थिक ‘देऊळ पाण्यात’!

मंदिरांवर अवलंबून असणाऱ्यांचे आर्थिक ‘देऊळ पाण्यात’!

Next
ठळक मुद्देकाेराेनामुळे मंदिर बंदचा परिणामअनेकांनी व्यवसाय बदललेत

- विनय टोले

अकाेला : अकाेला शहरामध्ये एकूण ७० माेठी मंदिरे आहेत. शहराचे आराध्य दैवत राजराजेश्वर असून, येथे भाविकांची दरराेज गर्दी असते, तर इतर माेठी मंदिरेही कमी-अधिक प्रमाणात गजबजलेली असतात. काेराेनामुळे शहरातील ७० मंदिरांवर अवलंबून असलेल्या पुजारी, फूल व्यावसायिक, प्रसादाच्या दुकानदारांवर मंदिर बंद असल्याने उपासमार आली आहे. त्यांचे आर्थिक देऊळ पाण्यात असून, बारा ज्याेतिलिंग मंदिराचे सचिव ॲड. सुभाषसिंह ठाकूर यांनी मंदिरांवर महापालिकेने लावलेला मालमत्ता कर रद्द करण्याची मागणी केली. काेराेनामुळे सर्वच अडचणीत आले आहेत. त्यामुळे मंदिरांनाही दिलासा देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

उधार-उसनवारीवर उदरनिर्वाह

काेराेनामुळे मंदिर बंद असल्याने हार, फूल, प्रसाद विक्रेते इतर व्यवसायांकडे वळले आहेत. काही दुकाने थाटून असले तरी राेजचा खर्चही निघत नाही. उधार-उसनवार करून सध्या ते आपल्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करीत आहेत.

बचत व भक्तांची मदत

मंदिरावर हाेणारा खर्च भाविक टाकत असलेल्या दानपेटीतून व्हायचा. काेराेनामुळे मंदिर बंद असल्याने मंदिराची बचत विश्वस्तांव्दारे आता हा खर्च करण्यात येत आहे.

 

मंदिरावर होणारा दररोजचा खर्च

माेठ्या मंदिरामध्ये असलेले कर्मचारी पगारी पुजारी, दरराेजची स्वच्छता असा सरासरी २५ ते ३५ हजाराहून अधिक खर्च आहे येताे.

मंदिरे बंद असल्याने व्यवसायावर माेठा परिणाम झाला आहे. काही घरगुती पूजांसाठी ग्राहक येतात; मात्र ती संख्या कमी असल्याने सध्या उसनवारीवरच भागवत आहाेत.

- विठ्ठल विटकरे, फूल व्यावसायिक

 

मंदिरे बंद असल्याने माेठ्या सकाळी येऊन पूजा करीत आहे. इतर उत्सव व कार्यक्रम बंद असल्याने भाविकांकडून हाेणाऱ्या पूजा बंद असल्याने सर्वच ठप्प झाले आहे

- हरिभाऊ कापडी, पुजारी

मंदिरे बंद असल्याने दानपेटी बंदच आहे. त्यामुळे संस्थानच्या बचतीमधून खर्च केला जात आहे. भाविकांकडून काही देणग्या मिळतात. त्यामधून सध्या सर्व खर्च भागिवला जात आहे.

- नरेश लोहिया, राजेश्वर संस्थान विश्वस्त

Web Title: The financial crisis on of those who depend on temples!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.