फाेन करा अन् पुस्तक मिळवा, अगदी माेफत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:13 AM2021-07-12T04:13:08+5:302021-07-12T04:13:08+5:30

राजेश शेगाेकार अकाेला : फाेन करा अन् पुस्तक मिळवा तेही अगदी माेफत, हाेय हे खरे आहे. अकाेल्यातील पर्यावरण ...

Find and get a book, for free! | फाेन करा अन् पुस्तक मिळवा, अगदी माेफत !

फाेन करा अन् पुस्तक मिळवा, अगदी माेफत !

Next

राजेश शेगाेकार

अकाेला : फाेन करा अन् पुस्तक मिळवा तेही अगदी माेफत, हाेय हे खरे आहे. अकाेल्यातील पर्यावरण अभ्यासक उदय वझे व त्यांच्या पत्नी शुभांगी वझे या दाेघांनी असा अभिनव उपक्रम हाती घेतला असून, गेल्या सहा जूनपासून आजतागायत त्यांना फाेन करणाऱ्यांना ते एक पुस्तक माेफत देतात.

वाचन संस्कृतीचे संवर्धन व जतन करण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेत असतात; मात्र वझे दाम्पत्यांनी वैयक्तिकस्तरावर उपक्रम हाती घेऊन आपले वेगळेपण जपले आहे. ते त्यांच्या संग्रहातील एक हजार पुस्तके पुढील ६ जून २०२२ पर्यंत म्हणजे वर्षभर वितरित करणार आहेत.

काय आहे हा उपक्रम

वझे दाम्पत्यांनी महिला व पुरुष अशी नावे असलेल्या चिठ्ठ्या तयार केल्या आहेत. दरराेज एक चिठ्ठी उघडून त्यामध्ये जे नाव येईल त्या नावाच्या व्यक्तीला ते पुस्तक दिले जाते. त्यासाठी त्यांनी पुस्तकाचे नाव, लेखक, पृष्ठ संख्या, किंमत व पुस्तकाचे मुख पृष्ठ यांचा समावेश असलेला एक मॅसेज ते राेज सकाळी व्हाॅटसॲपच्या विविध ग्रुपवर व्हायरल करतात. या मॅसेजमध्ये आज काेणत्या नावाच्या व्यक्तीला पुस्तक मिळणार याचा स्पष्ट उल्लेख मॅसेजमध्ये असताे. त्या नावाच्या व्यक्तीने वझे दाम्पत्यांनी दिलेल्या क्रमांकावर दूरध्वनी केला तर पहिल्या तीन व्यक्तीला मॅसेजमध्ये नमूद केलेले पुस्तक दिले जाते. उर्वरित व्यक्तींना इतर पुस्तक निवडण्याची मुभा ते देतात.

अगदी माेफत फक्त आधारकार्ड दाखवा

ज्या व्यक्तीच्या नावे पुस्तक मिळविण्यासाठी घाेषित झाले व त्यांनी काॅल केला त्यांना हे पुस्तक सकाळी १० ते दुपारी २ पर्यंत मिळते त्यासाठी काेणतेही शुल्क नाही, फक्त ओळख पटविण्यासाठी आधार कार्ड दाखविणे आवश्यक आहे.

काेट...

वाचनाची आवड दिवसेंदिवस कमी हाेत आहे. त्यामुळे आम्ही आमच्या संग्रहातील पुस्तके एखाद्या ग्रंथालयाला देण्यापेक्षा ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांच्यापर्यंत पाेहोचविण्यासाठी हा मार्ग निवडला आहे. उत्तम प्रतिसाद आहे. पुढील वर्षभर आम्ही हा उपक्रम सुरू ठेवणार आहाेत

उदय वझे

Web Title: Find and get a book, for free!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.