हरभरा घोटाळ्यासाठी विक्रेत्यांचे महाबीजकडे बोट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:21 AM2017-09-06T01:21:48+5:302017-09-06T01:21:48+5:30
गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अनुदानित दराचा हजारो िक्वंटल हरभरा बियाणे थेट खुल्या बाजारात विक्री होण्यास महाबीज जबाबदार असल्याचा अंगुलीनिर्देश जिल्हय़ातील सर्वच कृषी केंद्र संचालकांनी खुलाशामध्ये केल्याची माहिती आहे. २४ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत बियाणे विक्रीबाबत माहितीच नसल्याने हा प्रकार घडल्याचे केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कोणती कारवाई करणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : गेल्या वर्षीच्या रब्बी हंगामात अनुदानित दराचा हजारो िक्वंटल हरभरा बियाणे थेट खुल्या बाजारात विक्री होण्यास महाबीज जबाबदार असल्याचा अंगुलीनिर्देश जिल्हय़ातील सर्वच कृषी केंद्र संचालकांनी खुलाशामध्ये केल्याची माहिती आहे. २४ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरपर्यंत बियाणे विक्रीबाबत माहितीच नसल्याने हा प्रकार घडल्याचे केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी कोणती कारवाई करणार, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत गेल्या वर्षी कडधान्य बियाणे अनुदानावर देण्यात आले. त्यामध्ये रब्बी हंगामात हरभरा बियाणे पुरवठा करण्यासाठी महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ, कृभको या उत्पादकांना राज्याच्या कृषी विभागाने आदेश दिले. त्यानुसार सर्वाधिक बियाणे पुरवठा करणार्या महाबीजने २0 सप्टेंबरपूर्वी वि तरकांना हरभरा बियाणे वाटप केले. या बियाण्यासाठी शासनाकडून अनुदान मिळणार आहे, अशा सूचना त्यावेळी दिल्याच नसल्याचे वि तरक आणि कृषी केंद्र संचालकांचे म्हणणे आहे. नेमक्या याच त्रुटीचा फायदा घेण्याचा प्रयत्न गेल्या वर्षभरापासून वितरक, केंद्र संचालकांकडून सुरू आहे. एकीकडे एक कोटी रुपयांपर्यंतच्या बियाण्याचा काळाबाजार केल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी वितरक या गोंधळाची जबाबदारी महाबीजच्या गळ्यात टाकत आहेत, तर महाबीजनेही त्या सर्वांनाच पाठीशी घालण्याची भूमिका अगदी सुरुवातीपासूनच घेतल्याचे आतापर्यंतच्या कारवाईवरून दिसून येत आहे. त्यामुळे शासनाच्या अनुदानाचा लाभ प्रत्यक्ष शेतकर्यांना मिळू न देता मधल्या दलालांनीच लाटल्याचे हे उत्तम उदाहरण लगतच्या काळात पुढे आले आहे.
विभागीय कृषी सहसंचालकांच्या आदेशावरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या पथकाने केलेल्या चौकशीत मोठा घोटाळा उघड झाला. त्यामध्ये जिल्हय़ातील २११ कृषी केंद्र संचालकांनी हरभरा बियाण्याचा केलेला अपहार उघड झाला.
त्यापैकी १४६ कृषी केंद्र संचालकांना जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी एच.जी. ममदे यांनी नोटीस बजावल्या. त्यापैकी अनेकांनी स्वत:च, तर काहींनी एकाच वकिलामार्फत स्पष्टीकरण सादर केल्याची माहिती आहे. त्यामध्ये २३ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर २0१६ या काळात महाबीजने वितरकांना त्यांच्याकडून कृषी सेवा केंद्रांना मिळालेले बियाणे अनुदानित दरावर असल्याची माहितीच नव्हती, त्यामुळे ते ठरलेल्या दराने विक्री करण्यात आले. ती किंमत खुल्या बाजारातील भावाप्रमाणे होती. त्यातून शेतकर्यांना अनुदानाचा कोण ताही फायदा झालेला नाही. दरम्यान, काहींनी बाजारात वाढलेल्या प्रचंड दराचा लाभ घेण्यासाठी बियाणे टंचाई भासवून खुल्या बाजारात विक्रीही केली. काहींनी दलालामार्फत उखळ पाढरे करून घेतले. आता कारवाईच्या वेळी जबाबदारी झटकून शासनाची, जनतेची बनवाबनवी करण्याचा प्रयत्न सर्वच स्तरावर सुरू आहे. त्याचे उदाहरण वितरक, कृषी केंद्र संचालकांच्या स्पष्टीकरणातून दिसून येत आहे.
-