रेल्वे इंजीनमधील अग्निशामक यंत्र रुळावर!
By admin | Published: March 6, 2017 02:27 AM2017-03-06T02:27:28+5:302017-03-06T02:27:28+5:30
खोडसाळपणाचा संशय; बॉम्ब शोधक व नाशक पथक दाखल.
अकोला, दि. ५- अकोला ते शेगाव रेल्वे रुळावर अकोट फैल पुलाखाली रेल्वे इंजीन बदलण्याच्या ठिकाणावर रेल्वे इंजीनमधील अग्निशामक यंत्र काढून ते रुळावर टाकल्याची खळबळजनक घटना रविवारी पहाटे घडली. रेल्वे रुळावर घडलेल्या या गंभीर घटनेची माहिती मिळाल्यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी रेल्वे रुळाची पाहणी केली. दरम्यान, या प्रकरणी जीआरपीने अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रेल्वे स्टेशन परिसरातील रेल्वे रुळावर इंजीन बदलण्यासाठी ह्यआउटरह्ण आहे. रविवारी पहाटे या ठिकाणावर रेल्वेचे इंजीन उभे असताना अज्ञात व्यक्तीने इंजीनमधील अग्निशामक यंत्र बाहेर काढले आणि रुळावर फेकले. सदर अगिशामक यंत्र रुळाच्या बाजूला पडल्याने ते पंर झाले. काही वेळातच यामधील द्रवाची गळती सुरू झाली. या परिसरात काही प्रमाणात धूर निघाल्याने नागरिकांनी या यंत्राचा स्फोट झाल्याची अफवा केली; मात्र या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यासोबतच दहशतवाद विरोधी पथक, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, स्थानिक गुन्हे शाखा, तसेच श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या सर्व यंत्रणेद्वारे तपासणी केल्यानंतर अग्निशामक यंत्र हे रेल्वे रुळाच्या बाजूला पंर झाल्याने त्यामधील वायूची गळती झाल्याचे निष्पन्न झाले; मात्र प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपास यंत्रणेद्वारे या घटनेचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
रेल्वे इंजीनमधील अग्निशामक यंत्र इंजीनमधून काढून बाहेर फेकण्यात आले. या यंत्राच्या मुख्य बाजूला धक्का पोहोचल्याने ते पंर होऊन वायुगळती झाली. या वायुगळतीमुळे स्फोट झाल्याच्या तशाच अनेक प्रकारच्या अफवा करण्यात आल्या; मात्र यंत्रणेद्वारे तपासणी केली असता हा प्रकार खोडसाळपणाचा असल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. काहीही असले तरी पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे.
विजयकांत सागर,
अतिरिक्त पोलीस अधीक्षक, अकोला
यंत्रणांकडून तपासणी
या घटनेची तत्काळ पाहणी करून दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक नाशक पथक, श्वानपथकाद्वारे तपासणी करण्यात आली; मात्र रात्री उशिरापर्यंत हा प्रकार घातपाताचा नसल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलीस यंत्रणा आली तरी तपास गाभीर्ंयाने सुरू आहे. अग्नीशामक यंत्र फेकल्याने त्यामधून वायुगळती झाली आणि या वायूच्या गळतीमुळे काही प्रमाणात धूर निर्माण झाला होता.