पिंजर येथे घराला आग; २० हजारांचे नुकसान
By admin | Published: May 19, 2017 08:00 PM2017-05-19T20:00:15+5:302017-05-19T20:00:15+5:30
पिंजर: येथील वॉर्ड क्र. १ मधील एका कुडाच्या घराला सकाळी ९ वाजता अचानक आग लागल्याने त्यात सर्व साहित्य भस्मसात झाल्याची घटना शुक्रवारी घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंजर: येथील वॉर्ड क्र. १ मधील एका कुडाच्या घराला सकाळी ९ वाजता अचानक आग लागल्याने त्यात सर्व साहित्य भस्मसात झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या आगीत २० हजार रुपयांचे नुकसान झाले.
येथील महादेव विष्णू गवई हे फळे तयार करून विक्रीचा व्यवसाय करतात. फळे विकून आपला उदरनिर्वाह करून त्यांनी येथील इंदिरा नगर या वसाहतीत आपले छोटेशे कुळाचे घर घेऊन त्यावर टिनपत्रे टाकून संसार उभा केला. शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान कुळाला अचानक आग लागल्याने पाहता-पाहता संपूर्ण घर भस्मसात झाले; मात्र सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. तसेच या घराला लागून अनेकांची कुळाची घरे असून, परिसरातील जनतेने त्वरित आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. याबाबत तलाठी मानकर यांनी पंचनामा केला आहे. या आगीमध्ये टिनपत्रे, धान्य, कपडे व फळे जळाली असून, अंजाजे ३० हजारांचे नुकसान झाले आहे. सदर घटनेमुळे गवई कुटुंबाचा संसार उघड्यावर आला असून, शासनाने मदत करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.