जिल्हा स्री रुग्णालयात ‘फायर मॉक ड्रिल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:44 AM2021-01-13T04:44:59+5:302021-01-13T04:44:59+5:30

असे झाले मॉक ड्रिल रुग्णालयातील अग्निशामक सीओ-२, एबीसी आणि ड्राय पावडर सिलिंडरविषयी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्राथमिक माहिती देण्यात आली. त्याचा ...

'Fire Mock Drill' at District Women's Hospital | जिल्हा स्री रुग्णालयात ‘फायर मॉक ड्रिल’

जिल्हा स्री रुग्णालयात ‘फायर मॉक ड्रिल’

Next

असे झाले मॉक ड्रिल

रुग्णालयातील अग्निशामक सीओ-२, एबीसी आणि ड्राय पावडर सिलिंडरविषयी अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्राथमिक माहिती देण्यात आली.

त्याचा वापर कसा करावा या संदर्भात प्रत्यक्ष प्रात्याक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

त्यानंतर रुग्णालयातील मुख्य स्वीच कुठे आहे आणि आग लागल्यास त्यातील कोणते स्वीच बंद करावे याचे प्रात्याक्षिक देण्यात आले.

नव्या इमारतीमधील सिक्युरिटी अलार्म कसा कार्य करतो, याविषयीदेखील मार्गदर्शन करण्यात आले.

दर सहा महिन्यात एकदा फायर मॉक ड्रिल

जिल्हा स्री रुग्णालयात दर सहा महिन्यातून एकदा फायर मॉक ड्रिल करण्यात येते. भंडारा येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी जिल्हा स्री रुग्णालयात फायर मॉक ड्रिल घेण्यात आले. दरवर्षी रुग्णालय स्तरावरच या प्रकारचे फायर मॉक ड्रिल केले जाते, मात्र यंदा पहिल्यांदाच मॉक ड्रिलसाठी रुग्णालयातील सर्वच डॉक्टर, अधिकारी व कर्मचारी असे एकूण ७० जणांना एकाच वेळी प्रशिक्षण देण्यात आले.

भंडारा येथील घटना भयावह आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना अग्निशमन यंत्रणेचा उपयोग करता यावा, या उद्देशाने रविवारी खबरदारी म्हणून फायर मॉक ड्रिल घेण्यात आली. दर सहा महिन्यातून एकदा रुग्णालयस्तरावर फायर मॉक ड्रिल केली जाते.

- डॉ. आरती कुलवाल, वैद्यकीय अधीक्षक, जिल्हा स्री रुग्णालय

Web Title: 'Fire Mock Drill' at District Women's Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.