मेळघाट व्याघ्र प्रकल्पालगत पोपटखेड परिसरात वणवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 12:20 PM2021-03-31T12:20:09+5:302021-03-31T12:20:26+5:30
Fire near Melghat Tiger Project : पोपटखेड गावातील ई-क्लासच्या डोंगरावर आग लागल्याची घटना ३० मार्च रोजी घडली.
अकोट/ पोपटखेड : सातपुडा जंगलात व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या पोपटखेड गावातील ई-क्लासच्या डोंगरावर आग लागल्याची घटना ३० मार्च रोजी घडली. गावकऱ्यांनी धाव घेतल्याने मोठी हानी टळली. पोपटखेड गावाच्या उत्तर दिशेला भैय्युजी महाराज यांच्या प्रकल्पाकडे जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी ई-क्लास जागेजवळ हनुमान मंदिर आहे. या परिसरात डोंगरमाथ्यावर जंगल वाढले आहे. या जंगलात अचानक आग लागल्याने गावकऱ्यांनी धाव घेतली. पंरतु यावेळी हवेचा जोर जास्त असल्याने आग झपाट्याने पसरली. दरम्यान, अकोट येथून अग्निशमन दलाची गाडी बोलावण्यात आली. विशेष म्हणजे ही आग गावाचे दिशेने नसल्याने अनेक घरे बचावली. पंरतु या जंगलाच्या काही किलोमीटर अंतरावर मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे. या प्रकल्पाचे दिशेने आग पसरत असताना वेळीच आग विझविण्यासाठी प्रयत्न झाल्याने जंगलाची हानी टळली. सध्या उन्हाळ्यात जंगलात मोठ्या प्रमाणात पालापाचोळा असून या आगीचे कारण समजू शकले नाही. घटनास्थळी महसूल ग्रामीण पोलीस व वन कर्मचारी यांनी घाव घेतली होती. पोपटखेड गावालगतच पोपटखेड धरणही आहे. या धरणात पाणीसाठा आहे. शिवाय जंगलात नेहमीच आगी लागत असल्याने या धरणातून पाणी वापराची योजना कार्यान्वित करणे आवश्यक झाले आहे.