महाआवास उत्कृष्ट घरकुल योजनेसाठी मधापुरीला प्रथम पुरस्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:24 AM2021-08-18T04:24:36+5:302021-08-18T04:24:36+5:30
यामध्ये मधापुरीला प्रथम, तर राजनापूर खिनखिनीला द्वितीय व कंझरा ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...
यामध्ये मधापुरीला प्रथम, तर राजनापूर खिनखिनीला द्वितीय व कंझरा ग्रामपंचायतीला तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी माजी पंचायत समिती सदस्य मोहन रोकडे, मूर्तिजापूरचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बालासाहेब बायस, प्रशासन अधिकारी अभिजित बन्नोरे, विस्तार अधिकारी विजय कीर्तने, सरपंच प्रदीप ठाकरे, ग्रामसेवक रवींद्र राठोड, राजनापूर खिनखिनी सरपंच प्रगती कडू, ग्रामसेवक संदीप गाडेकर, सामाजिक कार्यकर्ते रूपेश कडू यांची उपस्थिती होती. यावेळी ग्रामपंचायत मधापुरी येथील केलेल्या विकासकामांचा आमदार पिंपळे यांनी आढावा घेतला. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत आठवडी बाजारात सार्वजनिक शौचालयाचे उद्घाटन आ. हरीष पिंपळे यांच्या हस्ते करण्यात आले. फळबाग योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या सीताफळ लागवडीची तसेच लहान मुलांसाठी खेळाचे मैदान, तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत बांधण्यात आलेले सभागृह, सार्वजनिक वाचनालय, वैयक्तिक रेशीम उद्योग तुती लागवडीची तसेच ग्राम मधापुरीच्या विविध विकासकामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. आमदार पिंपळे यांनी मधापुरी गाव दत्तक घेतल्याची घोषणा केली. यावेळी बाबूभाऊ देशमुख, संतोष शिरभाते, नीलेश मानके, राजेंद्र इंगोले, अखिल भटकर, राम खंडारे, सदार, सुशील खंडारे, अनंत विरुळकर, उपसरपंच रवींद्र सोळंके, ग्रा. पं. सदस्य नीतेश खलोरकर, माधुरी इंगळे, संगीता गांजरे, राजकन्या पवार, तंटामुक्त अध्यक्ष उमेश ठाकरे, संदीप ठाकरे, रवींद्र मोहिते, अजाब मोहिते, मिलिंद ठाकरे, ज्ञानेश्वर डोंगरे, धनराज जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी संजय नाईक, शुभम साव, नंदू सीरस्कार, आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन शिक्षक अजय मसनकर यांनी केले. आभार रवींद्र राठोड यांनी मानले.