आधी स्वच्छतागृह तोडले; आता निकृष्ट साहित्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:37 PM2018-12-10T12:37:39+5:302018-12-10T12:38:57+5:30

अकोला: महापालिकेत शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी असणारे स्वच्छतागृह शिकस्त नसताना ते तोडण्याचा प्रताप समोर आला आहे.

First broke the toilets; Now use degraded material | आधी स्वच्छतागृह तोडले; आता निकृष्ट साहित्याचा वापर

आधी स्वच्छतागृह तोडले; आता निकृष्ट साहित्याचा वापर

Next

अकोला: महापालिकेत शिक्षणाचे धडे गिरविणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी असणारे स्वच्छतागृह शिकस्त नसताना ते तोडण्याचा प्रताप समोर आला आहे. स्वच्छतागृह तोडल्यानंतर नव्याने बांधकाम करण्यासाठी अतिशय निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याची बाब प्रभाग क्रमांक १८ मधील भाजपचे नगरसेवक अमोल गोगे यांच्या निदर्शनास येताच सदर बांधकाम बंद करण्यात आले आहे. असे असले, तरी स्वच्छतागृह शिकस्त नसताना ते तोडून बांधण्याचा खटाटोप का, असा प्रश्न उपस्थित झाला असून, शिक्षण विभाग, मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ चे मुख्याध्यापक व कनिष्ठ अभियंता वादाच्या भोवºयात सापडले आहेत.
प्रभाग क्रमांक १८ अंतर्गत येणाºया शिवसेना वसाहतमध्ये मनपा मराठी मुलांची शाळा क्रमांक २६ असून, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती या शाळेचे नाव मोठ्या आदराने घेतल्या जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी प्रभागातील माजी नगरसेवक दिलीप देशमुख तसेच भाजपचे विद्यमान नगरसेवक अमोल गोगे, नगरसेविका जयश्री दुबे सतत प्रयत्नरत असल्याचे दिसून येते. चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी शाळेत सुस्थितीत स्वच्छतागृह असताना ते तोडण्याचा प्रताप शिक्षण विभागातील भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकाºयांनी केल्याचे समोर आले आहे. निविदेनुसार १० फूट बाय ८ फूट असे बांधकाम अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८ फूट बाय ६ फूट असे बांधकाम होत असून, त्यासाठी लागणारे साहित्य अत्यंत निकृष्ट व दर्जाहीन असल्याची माहिती नगरसेवक अमोल गोगे यांना मिळाली. अमोल गोगे यांनी तातडीने शहर अभियंता सुरेश हुंगे यांना अवगत केले असता, सुरेश हुंगे यांनी प्रत्यक्षात कामाची पाहणी केली असता निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याची बाब उघडकीस आली. स्वच्छतागृहाच्या बांधकामावर नियुक्त केलेले कनिष्ठ अभियंता नरेश कोपीकर यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. निकृष्ट बांधकामामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता सदर बांधकाम बंद करण्याचे निर्देश शहर अभियंता सुरेश हुंगे यांनी दिले आहेत.

 

Web Title: First broke the toilets; Now use degraded material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.