विदर्भातील पहिले बालस्नेही पाेलीस स्टेशन अकाेल्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:17 AM2021-03-19T04:17:55+5:302021-03-19T04:17:55+5:30
काेराेना याेद्ध्यांच्या सन्मानार्थ स्पर्धा काेराेना याेद्ध्यांच्या सन्मानार्थ अकाेला पाेलीस प्रशासनाकडून काेराेना जनजागृतीच्या उद्देशाने वाॅल पेटिंग स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले ...
काेराेना याेद्ध्यांच्या सन्मानार्थ स्पर्धा
काेराेना याेद्ध्यांच्या सन्मानार्थ अकाेला पाेलीस प्रशासनाकडून काेराेना जनजागृतीच्या उद्देशाने वाॅल पेटिंग स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले हाेते. काेराेना आजार न हाेण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी, या संदर्भातील चित्रे पाेलीस मुख्यालयाच्या भिंतीवर काढण्यात आली. यावेळी चित्र काढणाऱ्या कलाकारांना बक्षीस तसेच सन्मानचिन्ह देऊन गाैरविण्यात आले.
तीन पाेलीस ठाण्यांना ‘आयएसओ’ मानांकन
पाेलीस ठाण्यांच्या कामकाजामध्ये सुधारणा व्हावी तसेच कारभार सुरळीत चालावा यासाठी जिल्ह्यातील पाेलीस ठाण्यांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. या प्रयत्नांना चांगले यश मिळाले असून जिल्ह्यातील तीन पाेलीस ठाण्यांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे. यामध्ये अकाेट शहर, एमआयडीसी व माना पाेलीस स्टेशनचा समावेश आहे. पाेलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या कारकिर्दीतच या पाेलीस ठाण्यांना ‘आयएसओ’ मानांकन मिळाले आहे.