पश्चिम विदर्भातील पहिली नेत्रपेढी होणार अकोल्यात
By admin | Published: November 5, 2016 09:49 PM2016-11-05T21:49:07+5:302016-11-05T21:49:07+5:30
नेत्रदानाच्या क्षेत्रात अकोल्याचे महत्व वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर आता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रपेढी स्थापण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत
Next
>अतुल जयस्वाल / ऑनलाइन लोकमत
अकोला, दि. 5 - नेत्रदानाच्या क्षेत्रात अकोल्याचे महत्व वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर आता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रपेढी स्थापण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयास सादर करण्यात आला असून, सार्वजनिक आरोग्य सेवेकडून हिरवी झेंडी मिळाल्यास लवकरच नेत्रपीढी सुरु करण्यात येणार आहे. तसे झाल्यास ही पश्चिम विदर्भातील पहिली नेत्रपीढी ठरणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रात नेत्रदानास अनन्यसाधारण महत्व आहे. एकाच्या नेत्रदानाने दोघांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. नेत्रदानाबाबत वाढत्या जनजागृतीमुळे अकोल्यात मरणोत्तर नेत्रदानाचा टक्का वाढला आहे. मरणोत्तर नेत्रदान करणाºयांचे नेत्रगोलक संकलित करून ते नेत्रपेढीत ठेवण्यात येतात. तेथे प्रतीक्षा यादीत असलेल्या नेत्रहिनांवर नेत्रांचे प्रत्यारोपण करण्यात येते. सध्या विदर्भात केवळ नागपूर येथेच नेत्रपेढी आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यातील लोकांना नागपूर दुर पडत असल्याने सद्या येथे संकलित केलेले नेत्रगोलक जालना येथील नेत्रपेढीकडे पाठविले जातात. पश्चिम विदर्भातील अकोला शहराचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्व आणि येथील नेत्रदानाचा टक्का बघू जाता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रपेढी स्थापण करण्याच्या हालचाली अनेक महिन्यांपासून सुरु होत्या. येथील नेत्रविभाग त्या दृष्टीने सज्ज आहे. आता नेत्रपेढी स्थापण करण्याचा प्रस्ताव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून गत महिन्यात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयास सादर करण्यात आला आहे. तेथून हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य सेवेअंतर्गत येत असलेल्या ‘ह्यूमन आॅर्गन ट्रान्सप्लांट अथॉरिटी’ अर्थात मानवी अवयक प्रत्यारोपन प्राधिकरण (होटा)कडे सादर करण्यात येणार आहे. प्रस्ताव गेल्यानंतर ‘होटा’च्या चमूकडून येथील पायाभूत सुविधांचे पाहणी होईल व त्याबाबतचा अहवाल आरोग्य सेवेला सादर करण्यात येईल. सर्वकाही सुरळीत झाले, तर लवकरच येथे नेत्रपेढी सुरु करण्यात येईल. अकोल्यात नेत्रपेढी स्थापण झाल्यास त्याचा फायदा संपूर्ण पश्चिम विदर्भाला होणार आहे.
‘जीएमसी’चा नेत्र चिकित्सा विभाग सज्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रपेढी सुरु करण्यासाठी येथील नेत्रचिकित्सा विभाग पूर्णपणे सज्ज आहे. नेत्रपेढीसाठी आवश्यक सर्व यंत्रसामुग्री व इतर साहित्य येथे उपलब्ध आहे. ‘होटा’कडून मंजुरी मिळाली तर आजरोजी येथे नेत्रपेढी सुुरु केली जाऊ शकते.
‘होटा’ची मंजुरी गरजेची
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रपेढी सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव ‘सीएस’कार्यालयाकडून ‘होटा’कडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे नेत्रपेढीसाठी ‘होटा’ची मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रपेढी स्थापण करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यास आजरोजी नेत्रपीढी सुरु करण्याएवढा येथील नेत्रचिकित्सा विभाग सज्ज आहे. - डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.