पहिल्या देशी  बीटी कापसाला आली फुले, डॉॅॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे देशातील पहिले संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2017 08:00 PM2017-08-22T20:00:54+5:302017-08-22T22:17:10+5:30

अकोला, दि. 22 -  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीटी कापूस संशोधन केले असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी चाचणीसाठी पेरणी करण्यात ...

 The first indigenous Bt cotton came to Phule, Dr. The first research in the country of Punjabrao Deshmukh Agricultural University | पहिल्या देशी  बीटी कापसाला आली फुले, डॉॅॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे देशातील पहिले संशोधन

पहिल्या देशी  बीटी कापसाला आली फुले, डॉॅॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे देशातील पहिले संशोधन

Next

अकोला, दि. 22 -  डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने बीटी कापूस संशोधन केले असून, विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर यावर्षी चाचणीसाठी पेरणी करण्यात आली आहे. या बीटीची वाढ जोमदार झाली असून, त्याला फुले, बोंडे धरली आहेत; पण सलग १२ दिवसांपासून कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी संप पुकारल्याने बीटीवर प्रतिकूल परिणाम होत आहेत.
 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व एका खासगी कंपनीने मिळून हे संशोधन पूर्ण केले आहे. कृषी विद्यापीठांनी निर्मित केलेल्या पीडीकेव्ही-जेकेएल ११६ कपाशीच्या वाणांमध्ये बीजी-२ चे जनुक टाकून नवे वाण विकसित करण्यात आले आहे. याकरिता हैदराबाद येथील बियाणे संशोधन संस्थेसोबत संशोधनाचा सामंजस्य करार करण्यात आला होता. या वाणाला केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून, या बियाण्याची चाचणी घेण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अकोल्यात मध्यवर्ती संशोधन केंद्र आहे. या केंद्रांतर्गत असलेल्या पश्चिम विभागाच्या प्रक्षेत्रावर चाचणीसाठी या बियाण्याची पेरणी करण्यात आली आहे. या पिकांची वाढ पाऊस नसताना सूक्ष्म सिंचनाच्या पाण्यावर झाली असून, हे झाड अडीच फुटांचे झाले आहे.
दरम्यान, समान काम, समान वेतन लागू करू न थकबाकी देण्यात यावी, या मागणीसाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सर्वच रोजंदारी मजुरांनी मागील १३ दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारल्याने कृषी विद्यापीठाचे हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान होत आहे. बीटी कापसाच्या पिकाला पाण्याची गरज आहे. संप असल्याने बीटीला पाणीसुद्धा मिळाले नाही. दोन दिवसांपूर्वी आलेल्या अल्प पावसावर तरलेल्या या पिकावर आता किडींचा पादुर्भाव होण्याची शक्यता असून, आवश्यक अन्नद्रव्ये मिळत नसल्याने फुले गळताना दिसत आहेत. मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावरील मुगाचे पीकही वाळले आहे; परंतु काढण्यासाठी मजूरच नसल्याने पावसाने हे पीक सडण्याच्या मार्गावर आहे. या संपावर तोडगा न निघाल्याने कृषी विद्यापीठाची इतरही संशोधनाची कामे प्रभावित झाली आहेत.

{{{{dailymotion_video_id####x845a5z}}}}

Web Title:  The first indigenous Bt cotton came to Phule, Dr. The first research in the country of Punjabrao Deshmukh Agricultural University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.