‘पीएम-किसान’च्या पहिल्या हप्त्यात २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 01:01 PM2019-03-12T13:01:12+5:302019-03-12T13:01:24+5:30

अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत तीन हप्त्यात जमा करण्यात येणार आहे.

In the first installment of 'PM-Kisan' in the farmers' accounts of 2000 rupees! | ‘पीएम-किसान’च्या पहिल्या हप्त्यात २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात!

‘पीएम-किसान’च्या पहिल्या हप्त्यात २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात!

googlenewsNext

-  संतोष येलकर

अकोला: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम-किसान) योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत तीन हप्त्यात जमा करण्यात येणार आहे. त्यामधील पहिल्या हप्त्याची प्रत्येकी २ हजार रुपये राज्यातील शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया ६ मार्चपासून सुरू करण्यात आली असून, यासंदर्भात लाभार्थी शेतकºयांना बँकांकडून ‘एसएमएस’ येत आहेत.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या अल्पभूधारक शेतकºयांच्या बँक खात्यात दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत जमा करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात गत १ फेबु्रवारी रोजी केंद्र शासनामार्फत करण्यात आली होती. त्यानुसार ‘पीएम-किसान ’ योजनेंतर्गत तीन हप्त्यात प्रत्येकी २ हजार रुपयांची रक्कम अल्पभूधारक शेतकºयांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी राज्यातील जिल्हानिहाय पात्र अल्पभूधारक शेतकºयांच्या याद्या केंद्र शासनाच्या ‘पीएम-किसान’ पोर्टलवर अपलोड करण्यात आल्या. त्यानंतर ‘पीएम-किसान’ योजनेच्या पहिल्या हप्त्यांत प्रत्येकी २ हजार रुपयांची रक्कम शेतकºयांच्या थेट बँक खात्यात पाठविण्याची प्रक्रिया केंद्र शासनामार्फत गत आठवडाभरापासून सुरू करण्यात आली. त्यानुसार राज्यातील लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया संबंधित बँकांमार्फत ६ एप्रिलपासून सुरू करण्यात आली असून, यासंदर्भात बँकांकडून शेतकºयांना ‘एसएमएस’ पाठविण्यात येत आहेत.

‘किसान पोर्टल’द्वारे येत आहेत ‘एसएमएस’!
‘पीएम-किसान ’ योजनेंतर्गत २ हजार रुपयांची पहिली सन्मान रक्कम तुमच्या बँक खात्यात पाठविली आहे. दर चार महिन्यांनी मिळणाºया या रकमेने तुमच्या शेतीच्या गरजांसाठी मदत होईल, असा ‘एसएमएस’ किसान पोर्टलद्वारे लाभार्थी शेतकºयांना येत आहेत.

‘पीएम-किसान’ योजनेंतर्गत केंद्र शासनामार्फत जिल्ह्यातील लाभार्थी शेतकºयांच्या बँक खात्यात प्रत्येकी २ हजार रुपयांची पाठविलेली रक्कम संबंधित शेतकºयांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया ६ मार्चपासून सुरू करण्यात आली आहे.
-अनंत वैद्य
सीईओ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, अकोला.

 

Web Title: In the first installment of 'PM-Kisan' in the farmers' accounts of 2000 rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.