आधी लगीन लोकशाहीचे; नवरदेवाने विवाहपूर्वी बजावला मतदानाचा हक्क
By सचिन राऊत | Published: April 26, 2024 11:14 AM2024-04-26T11:14:01+5:302024-04-26T11:14:39+5:30
शतप्रतिशत मतदानासाठी प्रशासनाकडून प्रयत्न प्रयत्न केले जात आहे. राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते देखील यासाठी प्रयत्नशील आहेत.
अकोला : लोकशाहीचा लोकोत्सव सर्वत्र साजरा होत असताना शुक्रवारी स्वतःच्या लग्नापूर्वी मतदानाचा हक्क बजावून अक्षय ढोरे रा. शिवर या नवरदेवाने आधी लग्न लोकशाहीचे याचा प्रत्यय देत मतदानाचा हक्क बजावला. लग्नापूर्वी नवरदेवाने मतदान केले.
शतप्रतिशत मतदानासाठी प्रशासनाकडून प्रयत्न प्रयत्न केले जात आहे. राजकीय पुढारी आणि कार्यकर्ते देखील यासाठी प्रयत्नशील आहेत. अक्षय ढोरे यांनी लग्नाला जाण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी नवरदेवाच्या कुटुंबीयांनी व त्यांच्या मित्रांनी लग्नाला निघण्यापूर्वी त्यांची कार शिवनी परिसरातील मतदान केंद्रावर आणून नवरदेवाला मतदानासाठी नेले. यावेळी प्रशासनाकडूनही नवरदेव अक्षय ढोरे यांचे कौतुक करण्यात आले. यासोबतच जिल्ह्यात बहुतांंच्या ठिकाणी नवरदेवाने व नवरीने लग्नाला जाण्यापूर्वी तसेच सोबत मतदानाचा हक्क बजावल्याची माहिती समोर येत आहे.