मातीविरहित लागवड तंत्रज्ञानाच्या प्रयोगाला मिळाले पहिले स्थान
By admin | Published: February 2, 2015 01:41 AM2015-02-02T01:41:53+5:302015-02-02T01:41:53+5:30
अकोल्याच्या विद्यार्थिनीची पुण्यात भरारी.
अकोला - मातीविरहित लागवड तंत्रज्ञानातून शेती फुलविण्याच्या अकोला येथील विद्यार्थिनीच्या प्रयोगाला पुण्यातील नौरोसजी वाडिया महाविद्यालयातर्फे आयोजित ह्यप्लॅन्ट सायन्सह्ण स्पर्धेत प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
पुण्यातील नौरोसजी वाडिया सायन्स कॉलेजतर्फे २९ आणि ३0 जानेवारी रोजी ह्यप्लॅन्ट सायन्सह्ण या विषयावर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत राज्यभरातून ४00 पेक्षा अधिक स्पर्धकांनी त्यांचे प्रयोग सादर केले होते. सलग ११ वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या या स्पर्धेत विज्ञान शाखेतील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
पुण्यातीलच फग्यरुसन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी ह्यहायड्रोफोनिक्स सॉइललेस अँग्रिकल्चरह्ण या विषयावर प्रयोग सादर केला होता. या प्रयोगातून कुपोषणमुक्तीचा संदेश देण्यात आला होता.
हा प्रयोग सादर करणार्या विद्यार्थ्यांंमध्ये दामिनी किशोर टाले, श्वेता साठे या विद्यार्थिनींचा समावेश होता. त्यांनी सादर केलेल्या प्रयोगाला ४00 प्रयोगांमधून प्रथम स्थान मिळाले. त्यांनी सादर केलेल्या प्रयोगामध्ये मातीविरहित लागवडीच्या तिन्ही पद्धतींचा एकाच ठिकाणी वापर करण्यात आला होता.
मातीचा वापर न करता पाणी आणि इतर पोषक घटकांपासून भाजीपाला आणि इतर शेतमालाचे उत्पादन घेता येऊ शकते, हे या प्रयोगातून दाखविण्यात आले होते. अशाप्रकारे सादर करण्यात आलेले हे पहिलेच मॉडेल आहे. त्यामुळे या प्रयोगाला पहिला क्रमांक लाभला. हा प्रयोग सादर करणारी दामिनी टाले ही मूळची अकोला येथील रहिवासी आहे. ती पुण्यात फग्यरुसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे.