प्रथमच कृ षी क्षेत्र परम शावक सृष्टी महासंगणकाशी जोडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 02:15 PM2020-01-10T14:15:16+5:302020-01-10T14:15:20+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जोड परम शावक सृष्टी या महासंगणकाशी घालून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.

For the first time, the agricultural sector will be linked to the Super computer param | प्रथमच कृ षी क्षेत्र परम शावक सृष्टी महासंगणकाशी जोडणार!

प्रथमच कृ षी क्षेत्र परम शावक सृष्टी महासंगणकाशी जोडणार!

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शेती क्षेत्रामध्ये महासंगणकासारख्या बाबींचा वापर होणे गरजेचे आहे. असे झाल्यास पीक सुधारणा, मृद व सूक्ष्म मूलद्रव्यांचे विश्लेषण त्याचप्रमाणे कीड व रोग प्रतिबंधकात्मक विश्लेषण करण्यास अतिशय सोपे होईल आणि त्यामुळे कृषी क्षेत्रातील संशोधन व विकासास गती मिळून इतर क्षेत्राप्रमाणे कृषी क्षेत्रातही प्रचंड झपाट्याने सकारात्मक बदल व्हावा, या दृष्टीने केंद्रीय इलेक्ट्रॉनिक व माहिती तंत्रज्ञान, दळणवळण तथा मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जोड परम शावक सृष्टी या महासंगणकाशी घालून देण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
या क्रांतिकारी महासंगणकाचे लोकार्पण ११ जानेवारी कृषी महाविद्यालय सभागृहात केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री अ‍ॅड. संजय धोत्रे यांच्या हस्ते होणार असून, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले तथा सीडॅक, पुणे या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर संस्थेचे महासंचालक डॉ. हेमंत दरबारी यांच्या विशेष उपस्थितीत होणार आहे. यावेळी महापौर अर्चना मसने, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार गोपीकिशन बाजोरिया, शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार रणधीर सावरकर, आमदार नितीन देशमुख, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य जैन्नुदिन जव्हेरी, गणेश कंडारकर, स्नेहा हरडे, विनायक सरनाईक, मोरेश्वर वानखडे, डॉ. सी. डी. मायी, डॉ. पी. जी. पाटील, अर्चना बारब्दे, विद्यापीठाचे संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता (कृषी) डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, संचालक, विस्तार शिक्षण डॉ. दिलीप मानकर उपस्थित राहतील.


काय आहे, परम शावक सृष्टी महासंगणक!

महासंगणकाचा वापर करून कृषी क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यास बराच वाव आहे. ही गरज विचारात घेऊन, कृषी जैव-सूचनांचे साधन म्हणून सीडॅक आपल्याकडे परम शावक सृष्टी प्रणाली सादर करीत आहे. परम शावक सृष्टीचा हवामानाचा त्वरित अंदाज वर्तविण्यासाठी वापर करता होईल. सीडॅकने विकसित केलेले हरिता प्रिया सोल्युशन, जे हवामानाची सूक्ष्म माहिती प्रदान करते. परम शावक सृष्टीमध्ये टँगो आणि अन्वया या सीडॅकच्या सॉफ्टवेअरचासुद्धा समावेश आहे. टँगो सॉफ्टवेअरच्या आधारे कुठल्या पिकाला, कुठले खत, तसेच कुठल्या पिकाला कुठले कीटनाशक वापरता येईल, हे समजून घेऊ शकतो.

Web Title: For the first time, the agricultural sector will be linked to the Super computer param

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.