अकरा वर्षांत पहिल्यांदाच जिल्ह्यात ‘मे’चा ताप कमी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:15 AM2021-05-28T04:15:06+5:302021-05-28T04:15:06+5:30
पर्यावरणातील बदल या तापमानातील चढ-उताराला कारणीभूत ठरत आहे. २०१० च्या मे महिन्यातील दुसरा आठवडा व यंदाच्या मे महिन्यातील तापमानाची ...
पर्यावरणातील बदल या तापमानातील चढ-उताराला कारणीभूत ठरत आहे. २०१० च्या मे महिन्यातील दुसरा आठवडा व यंदाच्या मे महिन्यातील तापमानाची तुलना केली असता अकरा वर्षांतील सर्वात कमी तापमान यंदाच्या मे महिन्यात असल्याचे दिसून आले. निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. त्यामुळे हवामान बदलत आहे. पावसाचे वेळापत्रक, हिवाळ्यातील थंडी व उन्हाळ्यातील तापमानात सुसूत्रता राहिलेली नाही. मे २०१० मध्ये ४५.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती व हे तापमान महिनाभर कायम होते. मात्र, यंदा अजूनही तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले नाही, तर मागील वर्षी दहा वर्षांतील सर्वाधिक ४७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती.
अकोल्यातील गरमीचे अनेक रेकॉर्ड
राज्यातच नव्हे तर देशात सर्वात गरम शहर म्हणून अकोल्याची ओळख आहे. उन्हाळ्यात अकोला जिल्ह्याचे तापमान ४७ अंश सेल्सिअसच्या पार पोहोचते. बहुतांश वेळेस जिल्ह्याचे तापमान राज्यात सर्वाधिक आढळते. त्यामुळे मागील अकरा वर्षांत जिल्ह्यात तापमानाचे अनेक रेकॉर्ड नोंदविले आहेत.
अकरा वर्षांतील तापमानाची नोंद
तारीख/वर्ष अंश सेल्सिअस
१८/२०११ ४५.१
२१/२०१२ ४४.८
२१/२०१३ ४६.३
२५/२०१४ ४४.२
२०/२०१५ ४६.४
१९/२०१६ ४७.१
२६/२०१७ ४५.७
२९/२०१८ ४५.१
३१/२०१९ ४५.८
२६/२०२० ४७.४
०५/२०२१ ४३.४