चार महिन्यांत पहिल्यांदाच ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या हजाराच्या आत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:13 AM2021-06-19T04:13:53+5:302021-06-19T04:13:53+5:30
दिलासादायक बाब, पण... ॲक्टिव्ह बाधित रुग्णांच्या आकड्यात झालेली घट ही दिलासादायक आहे. मात्र सद्य:स्थितीत सार्वजनिक ठिकाणी वाढणारी बेपर्वाई ...
दिलासादायक बाब, पण...
ॲक्टिव्ह बाधित रुग्णांच्या आकड्यात झालेली घट ही दिलासादायक आहे. मात्र सद्य:स्थितीत सार्वजनिक ठिकाणी वाढणारी बेपर्वाई लक्षात घेता हा आकडा कधीही वाढू शकतो. त्यामुळे कोरोनाला संपविण्यासाठी प्रत्येकाने खबरदारीने वावरले पाहिजे, असे आवाहन आरोग्यतज्ज्ञांनी केले आहे.
कोरोनाला संपविण्यासाठी सुरक्षात्मक खबरदारी घेऊन, मास्कचा वापर करून, गर्दीची ठिकाणे टाळून शून्याच्या प्रवासाकडे वाटचाल करायची आहे. टाळेबंदीच्या काळात जिल्ह्यातील नागरिकांनी दाखविलेल्या शिस्तीमुळे रुग्णांचा आकडा कमी होत आहे. तो शून्य होईपर्यंत सर्वांना पुढील काळात अशीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, आरोग्य उपसंचालक
मागील चार महिन्यांतील स्थिती
१ फेब्रुवारी : ६९७
१५ फेब्रुवारी : ९९८
२८ फेब्रुवारी : ३,४७६
०१ मार्च : ३,६६४
१५ मार्च : ६,८२०
३१ मार्च : ५,७८४
१ एप्रिल : ५,३३९
१५ एप्रिल : ४,०६८
३० एप्रिल : ५,३०२
१ मे : ५,३८२
१५ मे : ६,८२०
३१ मे : ४,३५१
१ जून : ४,१२१
१८ जून : ९९८