आचारसंहिता भंगचा पहिला गुन्हा मूर्तिजापुरात
By admin | Published: September 23, 2014 12:22 AM2014-09-23T00:22:52+5:302014-09-23T00:22:52+5:30
निवडणूक कार्यालयात वाद्ये वाजवून आणि बैलगाडीमध्ये येऊन तसेच झेंडे लावून त्यांनी आचारसंहितेचा भंग
अकोला : बैलगाडीमध्ये वाजत गाजत येऊन उमेदवारी अर्ज भरणे एका उमेदवाराच्या अंगलट आले असून, उमेदवाराविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा पहिला गुन्हा मूर्तिजापूर पोलिसांनी दाखल केला. मूर्तिजापूर येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी मधुकर पुंडलिक तेलगोटे यांच्या तक्रारीनुसार, हातगाव येथील बळीराम गोंडूजी इंगळे हे दुपारी मंगळवारी २.३0 ते ३ वाजताच्या सुमारास निवडणूक कार्यालयामध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बैलगाडीमध्ये आले. यावेळी त्यांच्यासोबत झेंडे व वाद्यांसह मोठय़ा संख्येने कार्यकर्ते होते. निवडणूक कार्यालयात वाद्ये वाजवून आणि बैलगाडीमध्ये येऊन तसेच झेंडे लावून त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे म्हटले आहे. मधुकर तेलगोटे यांच्या तक्रारीनुसार, मूर्तिजापूर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ६ वाजता भादंवि कलम १८८ व बीपी अँक्ट १३५ नुसार गुन्हा दाखल केला.