मत्स्य बीज संचयन कागदावरच; क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 05:49 PM2018-04-14T17:49:37+5:302018-04-14T17:49:37+5:30
अकोला : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे जाळे विणण्यात आले आहे. हे वर्ष सोडले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो. पण, मत्स्य बीज संचयनाची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याने एखाद्या संस्थेने किती मत्स्य बीज संचयन केले, याची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याचे वृत्त आहे.
अकोला : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी जिल्ह्यात मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचे जाळे विणण्यात आले आहे. हे वर्ष सोडले तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो. पण, मत्स्य बीज संचयनाची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याने एखाद्या संस्थेने किती मत्स्य बीज संचयन केले, याची अधिकृत माहितीच उपलब्ध नसल्याचे वृत्त आहे. याकडे मत्स्य आयुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यां चे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.
जिल्ह्यात एक मोठे व चार मध्यम सिंचन प्रकल्प असून, लघू प्रकल्पांची संख्या मोठी आहे. तसेच अनेक जण शेततळ््यात मत्स्य संगोपन करतात. त्यासाठी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस कमी असल्याने लघू व इतर छोट्या प्रकल्पात पाणी नाही. त्यामुळे मत्स्य व्यवसाय थोडा मंदावला असला, तरी मोेठ्या प्रकल्पात काही प्रमाणात मासेमारी सुरू आहे. पण, ज्या तळ््यात मत्स्य बीज सोडले जाते किंवा संचयन केले जाते याची आकडेवारी असणे गरजेचे आहे. ही जबाबदारी सहायक आयुक्त मत्स्य विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे. मत्स्य बीज ज्यावेळी सोडले जाते त्यावेळी त्याची नोंद घ्यावी लागते. जेवढे मत्स्य बीज सोडायचे सांगितले तेवढे सोडले की नाही, हे बघावे लागते. पण, याचा ताळेबंदच नसल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, मत्स्य बीज संचयन केल्याच्या पुराव्यासाठी नियमाप्रमाणे मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था अध्यक्ष, गावचा सरपंच किंवा पोलीस पाटील यांची सही घेतली जात आहे. याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
मत्स्य बीज संचयनयच्या वेळी मत्स्य आयुक्त क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची गरज असते. तेव्हाच किती मत्स्य बीज पाण्यात सोडण्यात आले, याची माहिती मिळेल; पण तसे होत नाही. मत्स्य व्यवसायला चालना देऊन संस्थांचे बळकटीकरण व आर्थिकदृष्ट्या सक्षम करायच्या असतील, तर याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
- प्रकाश पाटील, प्राधिकृत अधिकारी,वसंत मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित.
धानोरा (पाटेकर), ता. मूर्तिजापूर, जिल्हा अकोला.