बाळापुरात एकाच रात्री पाच घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:19 AM2021-01-23T04:19:03+5:302021-01-23T04:19:03+5:30
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सिंदीपुरा परिसरातील रजनी अनिल बेलोकार (४२) ह्या मुलासह राहतात. त्यांच्या पतीचे १ मार्च २०२०ला ...
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सिंदीपुरा परिसरातील रजनी अनिल बेलोकार (४२) ह्या मुलासह राहतात. त्यांच्या पतीचे १ मार्च २०२०ला निधन झाल्याने कार्यक्रमासाठी त्या २१ जानेवारी रोजी माहेरी नांदेडला गेल्या होत्या. गुरुवारी मध्यरात्री घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करीत आलमारीत ठेवलेले नगदी दोन लाख व ७० ग्रॅम सोने किंमत दोन लाख ३० हजार व चांदीचे दागिने असा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. तसेच शहरातील मोठा मोमीनपुरा परिसरातही चोरट्यांनी घरफोडी करीत ऐवज लंपास केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. रजनी अनिल बेलोकार यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहे. (फोटो)
----------------------------------
चोरीच्या घटनेत वाढ; नागरिकांमध्ये भीती
बाळापूर शहरासह परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. वाडेगाव, पारस व बाळापूर परिसरात झालेल्या चोरींचा अद्यापही तपास न लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, बाळापूर पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षकपदी दत्तात्र्यय आव्हाळे हे दि. २१ जानेवारीला सायंकाळी रुजू होताच चोरट्यांनी जणू आव्हान केले आहे.