अकोला जिल्ह्यात आचारसंहिता भंगाचे पाच गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 12:26 PM2019-04-17T12:26:59+5:302019-04-17T12:27:09+5:30
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हाभरात आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अकोला : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हाभरात आतापर्यंत आचारसंहिता भंगाचे पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये प्रचार रथावर क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात फलक लावल्याने भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात व वाहनचालकांवर २९ मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आपातापा येथे विना परवानगी सभा घेतल्याने काँग्रेसचे रवी शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलेगावचे ग्रामविकास अधिकारी गजानन वावगे यांच्याविरुद्धही आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तसेच विनापरवानगी सभा घेतल्याप्रकरणी प्रशांत गावंडे यांच्यासह २५६ कार्यकर्त्यांविरुद्ध तर मूर्तिजापूर तालुक्यातील सिरसो येथे घरावर विनापरवानगी फलक लावल्याप्रकरणी आचारसंहिता भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा प्रकारे आतापर्यंत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भातील अहवाल विभागीय आयुक्त, उप-जिल्हा निवडणूक अधिकारी यांना सादर करण्यात आला आहे.