पाच जणांचा मृत्यू; ९१ नवे पॉझिटिव्ह; मृतांचा आकडा २०१
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2020 03:01 PM2020-09-18T15:01:44+5:302020-09-18T15:04:03+5:30
शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी आणखी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २०१ वर गेला आहे.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर थांबण्याची कोणतीही चिन्हे नसून शुक्रवार, १८ सप्टेंबर रोजी आणखी पाच रुग्णांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा २०१ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये ९१ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ६२५८ झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शुक्रवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४०१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ९१ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११० अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये मुर्तिजापूर येथील १५ जणांसह अंबुजा सिमेंट फॅक्टरी कान्हेरी गवळी येथील नऊ , आदर्श कॉलनी येथील सात, रणपिसे नगर येथील पाच, जुने शहर , खडकी, जीएमसी, मलकापुर, येथील प्रत्येकी तीन, जठारपेठ,विठ्ठल नगर, रिधोरा, गोकुल नगर, आळंदा, हिरपुर ता. मुर्तिजापुर, जवाहर नगर येथील प्रत्येकी दोन, बोरगांव मंजु, पार्थडी ता. तेल्हारा , मच्छी मार्केट, पोळा चौक , जैन मार्केट कान्हेरी गवळी , मेहरे नगर, दहिगांव गांवडे , तेल्हारा , डाबकी रोड, कुरूम, सांगवामेळ ता. मुर्तिजापुर , अनभोरा , जवळा ता. मुर्तिजापुर, कुरणखेड, कपीलवस्तु नगर, कोठारी वाटिका, बाळापुर नाका , चिचोंली रूद्रायणी, जठारपेठ , म्हातोडी, बार्शिटाकळी, शास्त्रीनगर, शिवाजी विद्यालय , खोलेश्वर, रविनगर, महसुल कॉलनी, पाटणकर कॉलनी येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
पाच जणांचा मृत्यू
शुक्रवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५ जणांचामुत्यू झाला. यामध्ये रणपिसे नगर येथील ७७ वर्षीय पुरूष , संताजी नगर डाबकी रोड येथील ६८ वर्षीय पुरूष, माळीपुरा येथील ६५ वर्षीय पुरूष, कानशिवणी येथील ५३ वर्षीय पुरूष व अक्कलकोट, जुने शहर येथील ३५ वर्षीय पुरूष यांचा समावेश आहे.
१४६४अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६२५८ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४५९३ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २०१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १४६४ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.