दिवसभरात पाच जणांचा मृत्यू; १०३ नवे पॉझिटिव्ह, १४६ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 06:59 PM2020-09-14T18:59:22+5:302020-09-14T18:59:37+5:30
अकोला शहरातील तीन व मुर्तीजापूर तालुक्यातील दोन अशा एकूण पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १८६ वर गेला.
अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, सोमवार, १४ सप्टेंबर रोजी अकोला शहरातील तीन व मुर्तीजापूर तालुक्यातील दोन अशा एकूण पाच रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १८६ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १०३ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ५७२३ झाली आहे. दरम्यान, १४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्या ११६५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे १७६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १०३ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ७३ अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये जीएमसी येथील आठ, मलकापूर येथील सहा , मुर्तिजापूर येथील पाच, कौलखेड येथील चार, अकोट, आदर्श कॉलनी, जठारपेठ, तापडीया नगर येथील प्रत्येकी तीन, रामनगर, खडकी, गौरक्षण रोड, गीतानगर, मोठी उमरी, वाडेगाव, खदान येथील प्रत्येकी दोन, दुर्गा चौक, इडंस्ट्रीयल कोर्ट, चान्नी ता. पातूर, सुकोडा ता.अकोला, चांदूर, सोनोरी ता.मुर्तिजापूर, जयहिंद चौक, खोलेश्वर, लहान उमरी, वाशिम बायपास, रणपिसे नगर, वानखडे नगर, जूने शहर, विजय नगर, खेतान नगर, सुधीर कॉलनी, शिवाजी कॉलेजजवळ, केला प्लॉट, उदयवाडी खरप रोड, आगर, कच्ची खोली, रामदास पेठ, जोगळेकर प्लॉट, पिंजर, कृषी नगर, सिव्हील लाईन, दहिहांडा व दोंडगाव येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. सायंकाळी अहवाल आलेल्या रुग्णांमध्ये बोरगाव मंजू व आगर येथील प्रत्येकी चार, पातूर, बार्शीटाकळी, बाळापूर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी दोन, शास्त्री नगर, रुस्तमाबाद ता. बार्शीटाकळी, लहरीया नगर, चोहट्टा बाजार, गौरक्षण रोड, डाबकी रोड, मोठी उमरी, सिव्हील लाईन, गोडबोले प्लॉट व डोंगरगाव ता. अकोला येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.
अकोल्यातील तीन, मुर्तीजापूर तालुक्यातील दोघांचा मृत्यू
सोमवारी आणखी पाच जणांचे मृत्यू झाले. डाबकी रोड, अकोला येथील ६० वर्षीय महिला, भिडेवाडी बाळापूर रोड, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष, जठारपेठ, सिव्हील लाईन अकोला येथील ८० वर्षीय पुरुष, शिरसो, ता. मुर्तिजापूर, सोनारी ता. मुर्तिजापूर येथील ६४ वर्षीय महिला या पाच रुग्णांचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
१४६ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ७६, कोविड केअर सेंटर, अकोला येथून ६६, ओझोन हॉस्पीटल येथून तीन जण, कोविड केअर सेटर, बाळापूर येथून प्रत्येकी एकअशा एकूण १४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
११६५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५७२३ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४३७२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १८६ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ११६५ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.