वऱ्हाडातील जलसाठ्यात १५ दिवसांत पाच टक्के घट; आता ३५ टक्केच जलसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 02:41 PM2018-01-06T14:41:44+5:302018-01-06T14:48:54+5:30

अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड ) पाच जिल्ह्यातील ४८४ धरणात गत १५ दिवसांत पाच टक्के घट झाली असून, आजमितीस केवळ ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

five-fold reduction in 15 days; Now 35% of the water stock | वऱ्हाडातील जलसाठ्यात १५ दिवसांत पाच टक्के घट; आता ३५ टक्केच जलसाठा शिल्लक

वऱ्हाडातील जलसाठ्यात १५ दिवसांत पाच टक्के घट; आता ३५ टक्केच जलसाठा शिल्लक

googlenewsNext
ठळक मुद्देअकोलेकरांची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात तर १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात २९.८३ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ३.६७ टक्के आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात २२.२२ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ०.८९ टक्के, तर एकबुर्जी धरणात २४.९८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.


अकोला : पश्चिम विदर्भातील (वऱ्हाड ) पाच जिल्ह्यातील ४८४ धरणात गत १५ दिवसांत पाच टक्के घट झाली असून, आजमितीस केवळ ३५ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. अकोलेकरांची जीवनरेखा काटेपूर्णा धरणात तर १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा धरणात ३.६७ टक्के, वाशिम जिल्ह्यातील सोनल प्रकल्पात ०.८९ टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील पूसमध्ये १९.८२ तर अरुणावती धरणात १३.५२ टक्केच जलसाठा शिल्लक असल्याने वऱ्हाडडावरील जलसंकट गडद झाले आहे.
वºहाडात मोठे, मध्यम व लघू मिळून एकूण ४८४ प्रकल्प असून, या सर्व प्रकल्पात आजमितीस ३५.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या १६ डिसेंबर रोजी हा जलसाठा ३९.७८ टक्के होता, तर नोव्हेंबरमध्ये ४९.९७ टक्के होता. यावर्षी ४ जानेवारीपर्यंत जलसाठ्यात मोठी घसरण झाली असून, अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा या मोठ्या धरणात १४.३६ टक्केच जलसाठा शिल्लक होता. याच जिल्ह्यातील मोर्णा मध्यम प्रकल्पात १५.०३ टक्के, निर्गुणा ५८.४१, उमा धरणात केवळ ३.७७ टक्के जलसाठा शिल्लक आहे. दगडपारवा धरण शून्य टक्के आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या वान धरणात सध्या ९०.१९ टक्के जलसाठा आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा धरणात २९.८३ टक्के जलसाठा असून, खडकपूर्णा धरणाची पातळी ३.६७ टक्के आहे. पेनटाक ळी धरणात २८.४३ टक्के जलसाठा आहे. ज्ञानगंगामध्ये ५०.०७, मसमध्ये १५.६३ टक्के, कोराडी १५.६१, पलढग ७८.०३, मन १६.४८ तोरणा २३.७० टक्के, तर उतावळी धरणात ३१.१८ टक्के जलसाठा शिल्लक आहे. वाशिम जिल्ह्यातील अडाण धरणात २२.२२ टक्के, सोनल मध्यम प्रकल्पात ०.८९ टक्के, तर एकबुर्जी धरणात २४.९८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस धरणात १९.८२ टक्के, अरुणावतीमध्ये १३.५२, तर बेंबळा धरणात १६.५९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा या मोठ्या धरणात ७०.४८ टक्के एवढा बºयापैकी जलसाठा शिल्लक आहे.


बाष्पीभवनाचा दर ३.६ मिलिमीटर!
सध्या हिवाळा ऋतू असल्याने बाष्पीभवनाचा दर ३.६ मिलिमीटर एवढाच आहे. तरी जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. तापमान वाढले तर बाष्पीभवन वेग या भागात १८ मिलिमीटरपर्यंत जातो, त्यामुळे आतापासून विशेषत: पश्चिम वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे.

Web Title: five-fold reduction in 15 days; Now 35% of the water stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.