जिल्ह्यातील गुंडांच्या पाच टाेळ्या दाेन वर्षांसाठी हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:23 AM2021-08-19T04:23:55+5:302021-08-19T04:23:55+5:30

माना पाेलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी तसेच जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर टाेळीने गुन्हे करणारे मोहम्मद नईम अब्दुल सिद्दिकी वय ३२ वर्षे ...

Five gangs of goons in the district were deported for two years | जिल्ह्यातील गुंडांच्या पाच टाेळ्या दाेन वर्षांसाठी हद्दपार

जिल्ह्यातील गुंडांच्या पाच टाेळ्या दाेन वर्षांसाठी हद्दपार

Next

माना पाेलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवासी तसेच जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर टाेळीने गुन्हे करणारे मोहम्मद नईम अब्दुल सिद्दिकी वय ३२ वर्षे रा़ कुरुम, मोहम्मद सोहेल अब्दुल मसूद, वय ३० वर्षे, रा. कुरुम या दाेन जणांना दाेन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे़

आकाेट फैल पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेले व जिल्हाभर गुंडगिरी करणारे शोयब बेग अजहर बेग, वय २४ वर्षे रा. रामदास मठ, अकाेट फैल, शेख सोहेल खान शेख युसूफ वय २२ वर्ष रा़ भारत नगर, शेख रेहान कुरेशी युसुफ कुरेशी वय २४ वर्ष रा़ सोळाशे प्लॉट या तीन गुंडांना जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे़

सिव्हील लाइन्स पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी तसेच टाेळीने गुंडगिरी करणारे रवी बापुराव इंदाने वय ४७ वर्ष रा़ जुने शहर, शामसुंदर श्रीधर देशपांडे वय ५२ वर्ष रा़ लक्ष्मीनगर माेठी उमरी या दाेन गुंडांना दाेन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे़ या तीनही टाेळ्यातील सात गुंडांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे़

तेल्हारा पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी तसेच कुख्यात गुंडांच्या टाेळीतील निखील श्रीकृष्ण अग्रवाल वय २७ वर्ष रा. खेलदेशपांडे ता. तेल्हारा, नितीन निरंजन गवारगुरु वय ३० वर्ष रा़ उबारखेडे ता. तेल्हारा या दाेघांना जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे़

बाळापूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत टाेळीने गुन्हे करणारे निवृत्ती राजेंद्र म्हैसने वय ३२ वर्ष रा़ वाडेगाव व योगेश मुरलीधर केकण वय २४ वर्ष, चिंचोलीगण ता. बाळापूर या दाेन गुंडांना जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे़

आगामी काळात कावड पालखी महाेत्सव, माेहरम, नवरात्राेत्सव, गणेशाेत्सव, तसेच विविध सण, उत्सव लक्षात घेता पाेलीस अधीक्षक जी़ श्रीधर यांनी गुन्हेगारांवर अंकुश मिळविण्यासाठी उपाययाेजना सुरू केलेल्या आहेत़ त्याअंतंर्गत आतापर्यंत ५ टाेळ्यांना दाेन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले असून एका गुंडास कारागृहात स्थानबध्द करण्यात आले आहे़

Web Title: Five gangs of goons in the district were deported for two years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.